Join us

तब्बू म्हणते, हा प्रश्न विचारला की मला येते चीड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 14:51 IST

अभिनेत्री तब्बूचे नाव बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीमध्ये सामील आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तब्बूने रसिकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. ...

अभिनेत्री तब्बूचे नाव बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीमध्ये सामील आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तब्बूने रसिकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. नवभारत टाइम्सला दिलेल्या एका इंटरव्ह्रूमध्ये म्हणाली, मला जेव्हा माझा सिंगल राहण्याबाबत किंवा कामाला घेऊन प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा चीड येते. तब्बू पुढे म्हणाली मला सतत विचारण्यात येते तू कुठे गायब आहेस ?, तू चित्रपटात कमी दिसतेस ?,  तू सिंगल का आहेस ? असे प्रश्न मला सतत विचारण्यात येतात आणि मग मी चीड येते. आता कुठे जाऊन सिंगलवाला प्रश्न कमी झाला आहे. आता असे वाटत लोकांनी मला सिंगल स्वीकारले आहे.  तब्बू एखाद्या चित्रपटात काम करायला तेव्हाच होकार देते जेव्हा ती भूमिका मला भावते. एखादा चित्रपटाची कथा वाचताना तिला वाटले की ही भूमिका मला सूट होणारी आहे तर मी काहीही प्रश्न न विचारता चित्रपटा साईन करते. तब्बूने विजयपथ या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने त्यानंतर माचिस, विरासत, चांदनी बार, अस्तित्व, चीनी कम यांसारख्या चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या. माचिस, चांदनी बार यांसारख्या तिच्या चित्रपटांतील भूमिकांना तर राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. गोलमाल अगेननंतर पुन्हा तब्बू अजय देवगण यावर्षी स्क्रिन शेअर करणार आहे. दोघांनी आकिब अलीचा रोमांटिक-कॉमेडी चित्रपट साईन केला आहे. अजय आणि तब्बू लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहेत. मात्र शूटिंग सुरु होण्यापूर्वी एक ट्विस्ट आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजय देवगण आणि तब्बूच्या चित्रपटाक एक नवी हिरोईनची एंट्री झाली आहे. मिडे-डे च्या रिपोर्टनुसार सिद्धार्थ मल्होत्राचा चित्रपट अय्यारीमध्ये दिसणारी रकुल प्रीत सिंग या चित्रपटात ही झळकणार आहे. रकुल प्रीत 2014 मध्ये आलेल्या टी-सिरिजच्या यारियां चित्रपटात दिसली होती. मात्र या चित्रपटातने रकुलला फारशी ओळख मिळवून नाही दिली. यारियांनंतर रमेश सिप्पीने तिला त्यांच्या नव्या चित्रपटात साईन केले होते. ज्यात हेमा मालिनी यांची ही महत्त्वाची भूमिका होती. मात्र अजून या चित्रपटाते शूटिंग सुरु झालेले नाही.