लग्नाच्या प्रश्नावरून संतापते तब्बू, ‘या’ प्रश्नांमुळेही येतो तिला राग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 20:30 IST
अभिनेत्री तब्बू हिने नुकतेच एका मुलाखतीत स्वत:विषयी काही खुलासे केले. तब्बूने सांगितले की, काही प्रश्न असे आहेत जे ऐकून ...
लग्नाच्या प्रश्नावरून संतापते तब्बू, ‘या’ प्रश्नांमुळेही येतो तिला राग!
अभिनेत्री तब्बू हिने नुकतेच एका मुलाखतीत स्वत:विषयी काही खुलासे केले. तब्बूने सांगितले की, काही प्रश्न असे आहेत जे ऐकून मला त्रास होतो. किंबहुना मला संताप होतो. मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत तब्बूने म्हटले की, मला सर्वात जास्त संताप तेव्हा होतो जेव्हा लोक मला माझ्या सिंगल असण्यावरून प्रश्न विचारतात. ‘तुम्ही सिंगल असण्यामागचे नेमके कारण काय?’ असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा मला भयंकर संताप येतो. तब्बूने मुलाखतीत सांगितले की, ‘तू कुठे गायब होती? तू खूप कमी चित्रपट करतेस यामागचे कारण काय? तू खूपच कमी बघावयास मिळतेस?, तू अद्यापपर्यंत सिंगल का आहेस? असे प्रश्न जेव्हा मला विचारले जातात तेव्हा माझा भयंकर संताप होतो. मला या सर्व प्रश्नांची चीड वाटते. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून मला सिंगल असण्यावरून विचारणे थोडेसे कमी झाले आहे. कदाचित लोकांनी मला सिंगल स्वीकार केले असावे किंवा वारंवार तोच एक प्रश्न विचारून लोक थकले असावेत, असेही तब्बूने सांगितले. यावेळी तब्बूने हेदेखील स्पष्ट केले की, कोणत्याही चित्रपटाला तेव्हाच होकार देते जेव्हा त्याची कथा आणि पात्र हे माझ्यासाठी योग्य व भारदस्त असेल. बºयाचदा असेही होते, जेव्हा मी एखाद्या चित्रपटाची कथा वाचत असतानाच मला जाणीव होते की, हे पात्र मला सूट होणार नाही तेव्हा मी लगेचच त्यावर विचार करायला सुरुवात करते. जर एखादे पात्र मला योग्य वाटत असेल तर मी लगेचच त्यास होकारही देते. ‘दृश्यम’विषयी बोलताना तब्बूने सांगितले की, त्यावेळी मला ‘दृश्यम’सारखी भूमिका मिळणे अत्यावश्यक होते. ‘दृश्यम’मध्ये मी खूपच इमोशनल भूमिका साकारली आहे. खरं तर ही भूमिका माझ्यासाठी खूपच अवघड होती. कारण आई, महिला अन् एका पोलीस अधिकाºयाची भूमिका साकारणे म्हणावे तेवढे नक्कीच सोपे नाही.