Join us

जेव्हा हिरोच्या पत्नीमुळे तापसी पन्नूला सिनेमातून काढून टाकलं जायचं, अभिनेत्री म्हणाली- माझ्यासमोर...

By गीतांजली | Updated: November 18, 2020 11:12 IST

अभिनेत्री तापसी पन्नूला करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक कलाकाराला संघर्ष करावा लागतो. अभिनेत्री तापसी पन्नूलादेखील करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मॉडेलिंग करत असताना तिला तेलुगू चित्रपटसृष्टीतून चित्रपटाच्या ऑफर येण्यास सुरुवात झाली.आज ती बॉलिवूडची टॉप लीड अ‍ॅक्ट्रेस आहे. अभिनेत्री सांगितले की, एकदा तिला फक्त सिनेमात यासाठी काम मिळाले नव्हते कारण तिला फक्त हिरोची पत्नी म्हणून काम करायचे नव्हते. 

अलीकडेच फिल्मफेअरशी बोलताना तापसी पन्नूने सांगितले की, कारकिर्दीच्या सुरुवातीस तिला हिरोमुळे अनके अडचणींचा सामना करावा लागला आणि बरेच सहन करावे लागले. मुलाखती दरम्यान ती म्हणाली, सुरुवातीला मला काही विचित्र गोष्टींचा सामना करावा लागला जशी की मी फार सुंदर दिसत नाही. मला सिनेमातून केवळ यासाठी रिप्लेस केले गेले कारण  हिरोची पत्नीची इच्छा नव्हती की मी सिनेमात काम करावं. मी माझ्या एका चित्रपटासाठी डबिंग करत होतो आणि मला सांगण्यात आले की हीरोला माझा संवाद आवडत नाही, म्हणून मी ते बदलले पाहिजे.

पुढे ती म्हणाली, जेव्हा मी असे करण्यास नकार दिला, तेव्हा त्याने मला माझ्यामागे एक डबिंग कलाकाराला तयार केले गेले. माझ्यासमोर घडलेल्या या गोष्टी आहेत, माझ्या पाठीमागे काय घडले आहे ते मला माहिती नाही.अपार कष्ट, जिद्द, चिकाटी या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये असे काही यश मिळवले की ‘बॅड लक हिरोईन’ म्हणणा-यांची तोंड बंद झालीत. 

टॅग्स :तापसी पन्नू