Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाईनसोबत बिस्किट कुणी खातं का? स्वरा भास्कर झाली ट्रोल, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 14:20 IST

अनेक मुद्यावरून स्वरा ट्रोल झालीय. आता मात्र ती एका वेगळ्याच कारणाने ट्रोल होतेय.

ठळक मुद्देअलीकडे स्वरा भास्कर ‘फ्लेश’ या वेब सीरिजमध्ये पोलिस अधिका-याच्या भूमिकेत झळकली होती. लवकरच ती ‘शीर कुरमा’ या चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करसाठी ट्रोल होणे नवी गोष्ट नाही. अनेक मुद्यावरून स्वरा ट्रोल झालीय. आता मात्र ती एका वेगळ्याच कारणाने ट्रोल होतेय. होय, स्वराने एक रेसिपी शेअर केली आणि लोक संतापले. तू वेडी तर नाही झालीस, असे काय काय लोकांनी तिला सुनावले. आता ही रेसिपी काय तर, जाणून तुम्हालाही धक्का बसेल.स्वराचा एक व्हिडीओ ‘फिल्मफेअर’ने शेअर केला आहे. यात स्वरा काय करतेय तर चक्क वाईनमध्ये बुडवून बिस्किट खातेय. ‘मित्रांनो, ही आहे सर्वात उत्तम ख्रिसमस रेसिपी,’ असे ती या व्हिडीओत म्हणतेय. बिस्किट अतिशय काळजीपूर्वक वाईनमध्ये बुडवा आणि पटकन् खाऊन टाका, असेही ती सांगतेय.

(filmfare)

तिचा हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झालेत. वाईनमध्ये बिस्किट बुडवून कोण खातं? असा सवाल करत अनेक युजर्सनी यानंतर तिला ट्रोल करणे सुरू केले. इतका दिमाग खराब है क्या, असे एकाने विचारले.

तर अन्य एकाने ‘आता हिने कंगनाला आयती संधी दिलीये,’ असे लिहित तिला ट्रोल करण्याचा सल्ला दिला. एकंदर काय तर स्वराची रेसिपी अनेकांना पचायला जड गेली, आता यावरून ट्रोलर्सने सुनावले शब्द स्वराला पचतात की नाही, ते बघूच.

स्वरा भास्कर याआधीही अनेकदा ट्रोल झाली आहे.  आपल्या रोखठोक भूमिकेमुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत सक्रिय असतानाही स्वरा सामाजिक, राजकीय व आर्थिक मुद्यावर परखड मत मांडताना दिसते. अलीकडे स्वरा भास्कर ‘फ्लेश’ या वेब सीरिजमध्ये पोलिस अधिका-याच्या भूमिकेत झळकली होती. लवकरच ती ‘शीर कुरमा’ या चित्रपटात दिसणार आहे. यात ती दिव्या दत्ता व शबाना आझमी यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :स्वरा भास्कर