Join us
Daily Top 2Weekly Top 5

या व्यक्तिचा ‘स्वॅग’ पाहा...! अभिनेत्री स्वरा भास्करही झाली फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 14:28 IST

स्वरा भास्करने शेअर केला व्हिडीओ

ठळक मुद्देआता या व्हिडीओत काय आहे तर बराक ओबामा बास्केटबॉल खेळत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ स्वत: ओबामांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण ओबामांवर फिदा झाले आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर सुद्धा यापैकी एक. ओबामांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडली. ओबामा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर स्वराने ट्विट केले आहे. ‘या व्यक्तीचा स्वॅग पाहा’,असे म्हणत तिने बराक ओबामा यांचे तोंड भरुन कौतुक केले आहे. तिचे हे ट्विट सुद्धा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

आता या व्हिडीओत काय आहे तर बराक ओबामा बास्केटबॉल खेळत आहेत.  एखाद्या प्रोफेशनल खेळाडूसारखे ते  बास्केटबॉल खेळताना दिसत आहेत. बॉल कॅच करतात आणि पुन्हा अगदी सहजपणे तो बास्केटमध्ये टोलवतात. त्यांचा हा अंदाज पाहून तिथे उपस्थित सगळेजण चीअर करू लागतात. हा व्हिडीओ बायडेन यांच्यासाठी ओबामा करत असलेल्या कॅम्पेनदरम्यानचा आहे. ‘ही एक गोष्ट आहे, जी मी करतो,’ असे त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे. त्यांच्या या व्हिडीओवर जगभरातील नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. स्वरानेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.

स्वराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, अलीकडे ती ‘फ्लेश’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. मानव तस्करीवर आधारित या वेबसीरिजमध्ये स्वरा पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसली होती. चित्रपटांबद्दल बोलाल तर ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमात ती अखेरची दिसली होती. गोड चेहरा आणि उत्तम अभिनय साकारणारी  स्वरा भास्कर सह-अभिनेत्रीच्या भूमिकेतून नावारूपास आली. तन्नू वेड्स मन्नू, रांझणा, प्रेम रतन धन पायो या चित्रपटांमध्ये तिने सहकलाकाराच्या भूमिका साकारल्या.2010 मध्ये स्वरा भास्कर हिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मुख्य भूमिकेत काम करण्याचे तिचे स्वप्न होते. पण, ते सुरूवातीच्या काळात पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, नंतर ‘नील बट्टे सन्नाटा; नंतर तिला मुख्य भूमिका मिळू लागल्या.  

टॅग्स :स्वरा भास्कर