बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या निवडणूक प्रचारात गुंतली आहे. बिहारच्या बेगुसरायमध्ये कन्हैया कुमार आणि दिल्लीत आम आदमी पार्टीच्या प्रचारात स्वराने हिरहिरीने भाग घेतला. आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणा-या स्वराने निवडणूक प्रचारादरम्यानही बेधडक वृत्तीचे दर्शन घडवत आपले राजकीय विचार मांडले. याचदरम्यान विमानतळावर स्वराला एक चाहता भेटला. पण या चाहत्याने जे काही केले ते पाहून खुद्द स्वराही चकीत झाली.होय, सध्या स्वराचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. यात विमानतळावर एक चाहत्या स्वराला भेटायला येतो. तो स्वराला सेल्फीसाठी विनंती करतो. स्वरा तयार होते. पण सेल्फी घेण्याऐवजी हा चाहता आपल्या मोबाईलने व्हिडीओ घेतो आणि ‘मॅडम, आएगा तो मोदी ही’ म्हणत स्वराला डिवचतो. एकंदर काय तर सेल्फीच्या नावाखाली हा चाहता स्वराला चांगलाच गंडवतो.
Viral Video : तो आला अन् स्वरा भास्करला ‘आएगा तो मोदी ही’ म्हणत डिवचून गेला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 11:10 IST
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या निवडणूक प्रचारात गुंतली आहे. याचदरम्यान विमानतळावर स्वराला एक चाहता भेटला. पण या चाहत्याने जे काही केले ते पाहून खुद्द स्वराही चकीत झाली.
Viral Video : तो आला अन् स्वरा भास्करला ‘आएगा तो मोदी ही’ म्हणत डिवचून गेला!
ठळक मुद्देस्वराने हा व्हिडीओ स्वत: शेअर करत, या चाहत्यांचा समाचार घेतला.