करिना कपूर खानच्या (Kareena Kapoor Khan) धाकट्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ (Jehangir)असल्याचा खुलासा झाला आणि सोशल मीडियावर पुन्हा एकदा ‘हंगामा’ झाला. सोशल मीडिया युजर्सनी करिना व सैफ अली खान (Saif Ali Khan) दोघांनाही जबरदस्त ट्रोल केलं. सैफ व करिनाने पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं होतं, तेव्हाही युजर्सनी सैफिनाला असंच ट्रोल केलं होतं. आता धाकट्या मुलाच्या नावावरूनही अनेक युजर्स सैफिनावर तुटून पडले. सैफिना अद्याप यावर काहीही बोललेले नाहीत. पण त्यांच्या बाजूने सैफची बहीण सबा मैदानात उतरली आणि पाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिनंही सैफिनाला ट्रोल करणाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला.
तर तुम्ही गाढव आहात..., मुलाच्या नावावरून करिनाला ट्रोल करणाऱ्यांवर बरसली स्वरा भास्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 10:34 IST
धाकट्या मुलाच्या नावावरूनही अनेक युजर्स सैफिनावर तुटून पडले आणि अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं सैफिनाला ट्रोल करणाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला.
तर तुम्ही गाढव आहात..., मुलाच्या नावावरून करिनाला ट्रोल करणाऱ्यांवर बरसली स्वरा भास्कर
ठळक मुद्दे2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता.