Join us
Daily Top 2Weekly Top 5

​भन्साळींना खुले पत्र लिहिणा-या स्वरा भास्करने स्वत:बद्दल केला एक मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 15:49 IST

‘पद्मावत’ पाहिल्यानंतर संजय लीला भन्साळींना खुले पत्र लिहून चर्चेत आलेली अभिनेत्री स्वरा भास्कर एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ...

‘पद्मावत’ पाहिल्यानंतर संजय लीला भन्साळींना खुले पत्र लिहून चर्चेत आलेली अभिनेत्री स्वरा भास्कर एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कालपरवा स्वरा एका टीव्ही शोमध्ये दिसली. या शोमध्येही स्वराने आपला तोच बिनधास्तपणा दाखवत आपल्या खासगी आयुष्यातील एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला. होय, या शोमध्ये स्वरा तिच्या लठ्ठपणावर बोलली. शिवाय लठ्ठपणा कमी करण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केल्याचा खुलासाही तिने केला. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री स्वत:च्या लठ्ठपणावर बोलायला कचरतात. कॉस्मेटिक सर्जरी करूनही ती केलीच नाही, असे छातिठोकपणे सांगतात. पण स्वरा मात्र बेधडकपणे यावर बोलली.  लठ्ठपणाबद्दल तिला काय वाटते, तेही तिने शेअर केले. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केल्यानंतरही मला माझ्या लठ्ठपणामुळे  अनेकदा असुरक्षित वाटते. पण यावर बोलण्यात मला कुठलाही संकोच वाटत नाही, असे स्वरा म्हणाली. लठ्ठपणा कमी करण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केल्याची कबुलीही स्वराने यावेळी दिली.भन्साळींना लिहिलेल्या खुल्या पत्रावरही ती बोलली. प्रकाशझोतात राहावे, म्हणून मी काहीही करत नाही. प्रसिद्धीसाठी मी भन्साळींना खुले पत्र लिहिले नव्हते.  ‘पद्मावत’मधील ‘जौहर’च्या दृश्यावर माझाआक्षेप होता आणि आजही आहे, असे स्वरा म्हणाली. ‘पद्मावत’मध्ये सतीप्रथेचे अर्थात ‘जौहर’चे उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोप करत, स्वराने यासंदर्भात प्रेक्षक या नात्याने एक खुले पत्रही लिहिले होते. ‘पद्मावत’मध्ये महिलांची एक वेदनादायी प्रतिमा मांडली आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा स्त्रियांना भूतकाळात घेऊन गेला.  स्त्रियांना, विधवांना, बलात्कार पीडितांना या समाजात पुरुषांच्या संमतीशिवाय मानाने जगण्याचा खरंच अधिकार नाही का?  स्वतंत्र भारतात अशा प्रकारे सती प्रथेचं उदात्तीकरण करणं हा गुन्हा आहे.   तिकीट काढून तुमचा चित्रपट बघणाºया प्रत्येकाला उत्तर देणे तुमची जबाबदारी आहे, असे स्वराने आपल्या खुल्या पत्रात भन्साळींना उद्देशून  लिहिले होते. अर्थात स्वराच्या या पत्राला भन्साळींनी अद्यापही उत्तर दिलेले नाही.ALSO READ : ​स्वरा भास्करच्या खुल्या पत्राला टीम ‘भन्साळी’चे खुल्या पत्रानेच उत्तर!