Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा स्वरा भास्करसाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी, वारंवार दिसली सावरताना, Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 16:23 IST

पूर्ण वेळ ती हा ड्रेस सावरताना दिसली. यामुळे स्वरा भलतीच नर्व्हसही झाली होती. या ड्रेसमुळे नर्व्हस झाल्याचे तिच्या चेह-यावर स्पष्ट जाणवत होते.

एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात. या प्रसंगी आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते.

असंच काहीसं घडलं होते स्वरा भास्करबरोबर. यावेळी तिने शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. हाच ड्रेस स्वरासाठी डोकेदुखी ठरला. पूर्ण वेळ ती हा ड्रेस सावरताना दिसली. यामुळे स्वरा भलतीच नर्व्हसही झाली होती. या ड्रेसमुळे नर्व्हस झाल्याचे तिच्या चेह-यावर स्पष्ट जाणवत होते.  

स्वरा नुकतीच तिच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश येथील बदायुला गेली होती. त्यावेळी तिने तेथील एका अनाथाश्रमाला भेट दिली होती. स्वरा भास्कर तिच्या अभिनयाइतकीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे ओळखली जाते. ती देशात सुरू असलेल्या विविध घटनांवर रोखठोक भाष्य करताना दिसते. ती सोशल मी़डियावर चांगलीच सक्रिय असून तिचे फॅन्स तिला सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॉलो करतात. स्वराच्या मतांशी काही वेळा लोक सहमत असतात तर काहीजण तिला सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसतात. पण एका कारणामुळे तिचे सा-यांनीच कौतुकही केले.

स्वराने कचरापेटीमध्ये सापडलेल्या एका मुलीला दत्तक घेतलं आहे. या मुलीसोबतचे फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. स्वरा नुकतीच तिच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश येथील बदायुला गेली होती. त्यावेळी तिने तेथील एका अनाथाश्रमाला भेट दिली होती. तिथल्या अनाथाश्रमाला एखादी मदत करावी या हेतूने ती तिथे गेली होती. पण तिथे गेल्यानंतर एका लहान मुलीची कथा ऐकून तिला प्रचंड वाईट वाटले. ही चिमुकली मुलगी त्या अनाथआश्रमाच्या संचालिका प्रियांका जौहरी यांना एका कचऱ्याच्या डब्यात सापडली होती.

टॅग्स :स्वरा भास्कर