Join us

स्वरा भास्कर हिने वाहतूक पोलिसासाठी तयार केला व्हीडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 21:05 IST

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने दिल्ली वाहतूक पोलिसांसाठी व्हीडिओ तयार केला असून, ‘हवा बदलो’ नावाने हा व्हीडिओ तुम्हाला सर्वत्र ...

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने दिल्ली वाहतूक पोलिसांसाठी व्हीडिओ तयार केला असून, ‘हवा बदलो’ नावाने हा व्हीडिओ तुम्हाला सर्वत्र दिसेल.स्वरा भास्कर केवळ अभिनयासाठी नव्हे तर सामाजिक भावनेतूनही काम करीत असते. तिने कार्मिक वर्मा यांच्या ‘हवा बदलो’ या व्हीडिओमध्ये काम केले आहे. वाहतूक पोलिसांना येणाºया समस्या या व्हीडिओद्वारा लोकांसमोर आल्याचा आनंद स्वराने व्यक्त केला आहे. स्वरा सध्या ‘अनारकली आॅफ आरा’ या चित्रपटात काम करते आहे.वाहतूक पोलिसांना अनेक समस्यांच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोलिसांना अशा स्थितीत काम करणे खूपच अवघड झाले आहे. पोलिसांच्या या समस्यांना लोकांसमोर आणणे गरजेचे आहे, असे स्वराने म्हटले आहे. पोलिसांचे हे प्रश्न सोडविण्यासाठी या व्हीडिओचा वापर झाला याचा आनंद आहे. व्हीडिओचा खर्च कमी करण्यासाठी शूटिंगसाठी विना मेकअप चार तास वाट पाहिली. वाहतूक पोलिसांच्या दृष्टीने हे काम अगदीच सोपे होते, असे तिला वाटते.स्वरा सध्या अनारकली आॅफ आरा या चित्रपटात काम करीत आहे. द्विअर्थी गाणं म्हणणाºया गायिकेची ही कथा आहे.