Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या वजनामुळे स्वरा भास्कर ट्रोल, उडवली जाते खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 12:46 IST

वाढलेल्या वजनामुळे स्वराला या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. स्वराचा हा लूक चाहत्यांना अजिबात आवडलेल दिसत नाही. त्यामुळे कमेंट्स करत तिला वेगवेगळी प्रश्न विचारताना दिसतायेत.

अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. चौकटीबाहेरच्या भूमिकांना तितक्याच ताकदीने न्याय देणारी अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली आहे. वीरे दी वेडिंग, नील बटे सन्नाटा, रांझणा अशा विविध हिंदी सिनेमात स्वराने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावरही ती तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर अनेकदा परखड मत मांडत सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते. त्यामुळे सोशल मीडियावर सगळ्यात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून स्वरा भास्करही ओळखली जाते. कधी कधी तिची मतं न पटल्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पुन्हा एकदा स्वरा चर्चेत आली आहे. यावेळी कारणही तसेच आहे. सोशल मीडियावर नुकतेच काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिने फोटो शेअर केले आहेत. 

हे फोटो शेअर होताच त्याला पसंती देणं तर सोडाच चाहत्यांनी टीका करायला सुरुवात केली. वाढलेल्या वजनामुळे स्वराला या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. स्वराचा हा लूक चाहत्यांना अजिबात आवडलेल दिसत नाही. त्यामुळे कमेंट्स करत तिला वेगवेगळी प्रश्न विचारताना दिसतायेत.सोशल मीडियावर स्वराची नेटीझन्स चांगलीच खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळतंय.

 

तर काहींनी तर स्वराला ड्रेसिंग सेन्स नसल्याचंच म्हटलं आहे. मात्र स्वरालाही या ट्रोलिंगचा फरक पडत नसल्याचे दिसतं.पहिल्यांदाच तिला अशा प्रकारे ट्रोल केले जात आहे असे नाही. या आधीही अनेकदा तिला ट्रोल केले गेले आहे.  बॉडी आणि चेहऱ्यावरून सारखं ट्रोल केलं गेल्याने स्वराही फारशी याकडे लक्ष देताना दिसत नाही. 

काही दिवसांपूर्वीच स्वरा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.स्वरा भास्कर 'शीर कोरमा' आणि 'जहां चार यार' सिनेमात झळकणार आहे.स्वराला तिच्या घरी स्पीड पोस्टद्वारे एक पत्र मिळाले होते. त्यात सावरकरांचा अपमान करणे थांबव आणि फक्त चित्रपटांवर लक्ष केंद्रीत कर, नाहीतर अंतिम संस्कार होतील, असे या पत्रात म्हटले होते. यासंदर्भात स्वराने वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर, 'शीर कोरमा' आणि  'जहां चार यार' सिनेमात ती झळकणार आहे.  

टॅग्स :स्वरा भास्कर