Join us

सुश्मिता सेनला करायचे दमदार ‘कमबॅक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 15:42 IST

तब्बल सात वर्षांपासून मोठ्या पडद्यावरून गायब असलेली अभिनेत्री सुश्मिता सेन हिला आता कमबॅकचे वेध लागले आहे. मात्र तिला साधेसुधे ...

तब्बल सात वर्षांपासून मोठ्या पडद्यावरून गायब असलेली अभिनेत्री सुश्मिता सेन हिला आता कमबॅकचे वेध लागले आहे. मात्र तिला साधेसुधे कमबॅक करायचे नसून, दमदारपणे मोठ्या पडद्यावर झळकायचे आहे. तिची पडद्यावरील झलक म्हणजेच ‘प्रेक्षकांनी दाताखाली बोट चावावे’ अशी असावी. अर्थात ही सुश्मिताची इच्छा असल्याने, ती पूर्ण होईल की नाही हे सांगणे तिलाही अशक्यच असेल, यात शंका नाही. अनिल कपूर प्रॉडक्शनच्या ‘नो प्रॉब्लम’ या सिनेमात अखेरीस झळकलेली सुश्मिता नुकतीच एका रेस्टॉरंटच्या ओपनिंग कार्यक्रमात पोहचली होती. यावेळी जेव्हा तिला कमबॅकविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने दिलेले उत्तर सगळ्यांनाच आश्चर्यचकीत करणारे ठरले. सुश्मिता म्हणाली की, माझे कमबॅक प्रेक्षकांच्या तोंडून, ‘बघा सुश्मिता परत आली’ असे वाक्य वदविणारे असावे. मला अपेक्षा आहे की, यावर्षी मी कमबॅक करेल. शिवाय पडद्यावरील माझी एंट्री प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील. २३ वर्षांपूर्वी मिस युनिव्हर्सचा ताज जिंकलेली सुश्मिता सेन नुकतीच युनिव्हर्स पॅजन्टच्या आयोजनात जज म्हणून सहभागी झाली होती. याविषयीचे काही अनुभव शेअर करताना सुश्मिताने सांगितले की, २३ वर्षांनंतर परत त्याच व्यासपीठावर पोहचल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पहिल्यांदा देशाला सन्मान मिळवून देण्यासाठी मी येथे आली होती अन् आज दुसºयांना आपल्या देशाच्या सन्मानासाठी त्या ताजपर्यंत पोहचविण्यासाठी मी येथे आली आहे. दोन्ही वेगवेगळे अनुभव असले तरी, माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. या व्यासपीठावर जज म्हणून आल्याचा मला आनंद होत असून, स्वत:ला गौरावांकित समजते. कारण मिस युनिव्हर्सच्या या स्पर्धेत आयोजकांनी एका भारतीय व्यक्तीला संधी दिल्याने मी समाधानी आहे. १९९४ मध्ये फिलिपिंस येथे आयोजित केलेल्या या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा ताज मिळवला होता. सुश्मिता जेव्हा या व्यासपीठावर जज म्हणून आली तेव्हा तिला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटले जेव्हा या स्पर्धेत तिच्याच नावाच्या चार सौंदर्यवतीने सहभाग घेतल्याचे तिला समजले. विशेष म्हणजे जेव्हा सुश्मिताने फिलिपिंस येथे मिस युनिव्हर्सचा ताज जिंकला होता, त्याचवर्षी या चारही सौंदर्यवतींचा जन्म झाला. ALSO READ :- ​सुश्मिता सेन म्हणते, मी ‘सीझन’ फॉलो करत नाही!- सुश्मिता सेनचे होणार ‘शॉर्ट’ दर्शन!- होय, मी ४० वर्षांची..सुश्मिताने सांगितले खरे वय..