अलीकडे फॅशन शो, एअरपोर्ट, दिवाळी पार्टी अशा सगळ्या ठिकाणी सुश्मिता सेन दिसली आणि या प्रत्येकवेळी तिची हेडलाईन झाली. याचे कारण या सगळ्याठिकाणी तिचा बायॅफे्रन्ड रोहमन शॉल हजर होता. सध्या सुश्मिता रोहमनच्या हातात हात घालून फिरतेय. साहजिकचं दोघांच्या लग्नाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. दोन दत्तक मुलींची आई असलेली सुश्मिता नववर्षात रोहमनसोबत लग्न करणार असे मानले जात आहेत. अर्थात लग्नाच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सुश म्हणतेय. पण एकीकडे ती लग्नाची शक्यता नाकारत असताना दुसरीकडे सोशल मीडियावरच्या तिच्या पोस्ट लग्नाचे संकेत देत आहेत. काल-परवा सुश्मिताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली. यात पोस्टमधील फोटोत सुश्मिताच्या होता तिच्या आईच्या लग्नातील बांगड्या आहेत.
‘माझ्या आईच्या लग्नातील बांगड्या,’ असे तिने या फोटोवर लिहिले आहे. सोबत हार्ट इमोजी आहे. सुश्मिताची ही पोस्ट बरेच काही सांगणारी आहे. सुश लवकरच लग्न करणार, हे सांगण्यासाठी ही पोस्ट पुरेशी आहे.
यावर रोहमनचे कमेंट पाहण्यासारखे आहे. होय, You amazing woman, I heart youअसे त्याने लिहिले आहे. यावर सुशने moreअसे उत्तर दिले आहे.एकंदर काय तर सुश आणि रोहमन यांचा रोमान्स चांगलाच जोरात आहे. दोन महिन्यांच्या डेटींगनंतर दोघेही एकमेकांत चांगलेच गुंतले आहेत. आता हे कपल लग्नाची बातमी कधी देते, त्याचीच प्रतीक्षा आहे.