Join us

All Is Well : ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान रंगला सुश्मिता-रोहमनचा रोमान्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 12:58 IST

अभिनेत्री सुश्मिता सेनचे बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चेला मध्यंतरी उधाण आले होते.  रोहमनच्या एकापाठोपाठ एक केलेल्या पोस्टमुळेच ही चर्चा पसरली होती. पण आता या जोडप्यात सर्वकाही आलबेल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्दे  काही महिन्याआधी सुश्मिता आणि रोहमनने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली केली होती.

अभिनेत्री सुश्मिता सेनचे बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चेला मध्यंतरी उधाण आले होते.  रोहमनच्या एकापाठोपाठ एक केलेल्या पोस्टमुळेच ही चर्चा पसरली होती. पण आता या जोडप्यात सर्वकाही आलबेल असल्याचे स्पष्ट झाले आहे. कालच रोहमनने त्याची लेडी लव्ह सुश्मितासाठी एक रोमॅन्टिक पोस्ट करत, ब्रेकअपच्या चर्चा चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले होते. आता  सुश्मितानेही ऑल इज वेल असल्याचे सांगत, रोहमनसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

हा फोटो शेअर करताना, He’s lean...she’s mean I love you @rohmanshawl #backtobasics #gym #home #dubai #wegotthis I love you guys!! असे सुश्मिताने लिहिले आहे. हा फोटो आणि त्याचे कॅप्शन यावरून सुश्मिता व रोहमन यांच्या नात्याबद्दल सगळे काही स्पष्ट झाले आहे. दोघेही एकमेकांसोबत आहेत, त्यांच्यात  ब्रेकअप झालेले नाही, यासाठी यापेक्षा आणखी कुठला पुरावा हवा.

  काही महिन्याआधी सुश्मिता आणि रोहमनने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली केली होती. अलीकडेच सुश्मिताभाऊ राजीवच्या विवाहालाही रोहमन उपस्थित होता. सुश्मितासेन बराच काळ सिनेमाच्या पडद्यापासून लांब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘नो प्रॉब्लम’ नंतर ती सिनेमात दिसलीच नाही. मात्र, रोहमनशी असलेल्या मैत्रीमुळे ती सतत चर्चेत असते. 

यावरून झाली होती ब्रेकअपची चर्चाइन्स्टाग्राम स्टोरीवर रोहमनने एका मागोमाग एक चार पोस्ट केल्या होत्या. ‘हे यू, मी तुझ्याशी बोलतोय.  तुला नेमका कशाचा त्रास होतोय? प्लीज,मला सांग, मी सर्वकाही मन लावून ऐकतोय. 24 तास,’ असे पहिल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते.  दुसºया एका पोस्टमध्ये रोहमने लिहिले होते की,‘  हे नातं पुढे नेण्यासाठी तुम्ही खूप काही करत आहात आणि तुमचा जोडीदार काहीच करत नाही, असे तुम्हाला वाटते. ठीक आहे. पण तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी जे काही करत आहात तो तुमचा निर्णय आहे. तुमच्या जोडीदाराकडूनही तुम्ही तशाच वागणूकीची अपेक्षा करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही त्या गोष्टी करा ज्या खरंच तुम्हाला कराव्याशा वाटतात. त्यानेही आपल्याशी तसेच वागावे यासाठी काहीही करु नका.’ पुढच्या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, ‘तुम्हाला वाटते की, तुमच्या जोडीदाराने तुम्हालाही तशीच वागणूक द्यावी जशी तुम्ही त्याला देता, कारण तुम्ही त्या नात्यात आहात. पण   कुणी तुमच्यासोबत चांगले वागत नाही आणि तरीही तुम्ही त्याच्यासोबत आहात तर   ही तुमची चूक आहे. म्हणून स्वत:वर प्रेम करायला शिका.’  आपल्या चौथ्या पोस्टमध्ये रोहमन भावूक झालेला दिसला होता. ‘ तुम्ही कधी एकटे राहून कंटाळता? ठीक आहे. रोज टीव्ही, फोन, पुस्तकांच्याशिवाय 15-20 मिनिटे स्वत:सोबत घालवा. स्वत:चा आवाज ऐका. यामुळे तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तर मिळायला सुरुवात होईल,’असे त्याने लिहिले होते. रोहमनच्या या पोस्टमुळे त्याचे सुश्मितासोबत  काहीतरी बिनसल्याचे मानले गेले होते.

टॅग्स :सुश्मिता सेन