Join us

​सुष्मिता सेनचा थायलॅँडमधील हॉलीडे इंस्टाग्रामवर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 12:17 IST

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नुकतीच आपल्या मुलींसोबत हॉलीडे साजरी करण्यासाठी थायलॅँडला जाऊन आली. तेथील काही फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर ...

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नुकतीच आपल्या मुलींसोबत हॉलीडे साजरी करण्यासाठी थायलॅँडला जाऊन आली. तेथील काही फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात तिने आपली सुटी कशी एन्जॉय केली याबाबत फोटोंसह माहितीही शेअर केली आहे. विशेष म्हणजे तिने हॉलीडेसाठी थायलंडला पसंती दिली आहे. तेथील एका फोटोमध्ये तिने गोल्ड गॉगल घातला असून ती त्यात अधिकच सुंदर दिसत होती. काही फोटोंमध्ये ती मुलींसोबत मनसोक्त एन्जॉय करीत आहे. आणि मुलीदेखील सुटीचा पुरेपूर एन्जॉय करीत आहेत.