देशात घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांवर सुष्मिता सेनने व्यक्त केले रोखठोक मत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 20:53 IST
अभिनेत्री सुष्मिता सेनने म्हटले की, मुलीच्या रूपात जन्माला येणे हाच माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. सुष्मिताला ‘आय एम वुमेन ...
देशात घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांवर सुष्मिता सेनने व्यक्त केले रोखठोक मत!
अभिनेत्री सुष्मिता सेनने म्हटले की, मुलीच्या रूपात जन्माला येणे हाच माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. सुष्मिताला ‘आय एम वुमेन अवॉर्ड २०१८’च्या समारंभात सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुष्मिताने मीडियाशी संवाद साधला. तिने म्हटले की, ‘मला असे वाटते की, मुलीच्या रूपात जन्माला येणे हाच माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा पुरस्कार आहे. तसेच करण गुप्ता एज्युकेशन फाउंडेशनसारख्या संस्थेकडून पुरस्कार प्राप्त करणे हे माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे.’ या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत काम करणाºया महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. दरम्यान, देशात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे सुष्मिताला विचारले असता तिने सांगितले की, ‘मी अशाप्रकारच्या मुद्द्यांवर मत व्यक्त करणे बंद केले आहे. कारण आपण एका ठराविक काळापर्यंत अशाप्रकारच्या मुद्द्यांवर खूप बोलत असतो. विरोध करीत असतो. मात्र अशातही जेव्हा यावर काही ठोस उपाययोजना केल्या जात नाही, तेव्हा खूप संताप होतो. आपल्या देशासह जगभरात अशाप्रकारच्या घटना समोर येत आहेत. हे खरोखरच दु:खद आहे. आपल्याकडे दोन गोष्टींचे पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे आपण यावर दु:ख व्यक्त करून सर्वकाही विसरणे अन् दुसरा म्हणजे आपण समाजासमोर असे एक उदाहरण ठेवावे जेणेकरून असे कृत्य करणाºयाने विचार करावा. सुष्मिताच्या मते, ‘आपल्या देशात असे पुरूष आहेत, जे महिलांना मदत आणि त्यांचे समर्थन करतात. त्यामुळे आपण अशा गुन्ह्यांना चर्चेत आणण्यापेक्षा महिलांचा आदर करणाºया लोकांना प्रसिद्धीझोतात आणायला हवे. असे केल्यास मला अपेक्षा आहे की, अशाप्रकारच्या घटनांना नक्कीच आळा बसू शकेल. दरम्यान, सुष्मिता बºयाच काळापासून पडद्यावरून गायब आहे. तिने लवकरच कमबॅक करावे, अशी तिच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.