Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुश्मिता सेनच्या घरी वाजणार सनई-चौघडे! जाणून घ्या, कोणाचे होतेय लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 11:46 IST

सुश्मिता सेन गेल्या काही महिन्यांपासून मॉडेल रोहमनला डेट करतेय. अशात सुश्मिताच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत.

ठळक मुद्देनीरजसोबत ब्रेकअप झाल्यानंतर चारूच्या आयुष्यात राजीवची एन्ट्री झाली. राजीव हा पेशाने मॉडेल आहे. 

सुश्मिता सेन गेल्या काही महिन्यांपासून मॉडेल रोहमनला डेट करतेय. अशात सुश्मिताच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. पण थांबा...थांबा...लग्न सुश्मिताचे  तर तिचा लहान भाऊ राजीव सेन याचे लग्न होतेय.होय, राजीव लवकरच टीव्ही स्टार चारू असोप हिच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. अलीकडे दोघांचा साखरपुडा झाला. सुश्मिताने ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली. ‘तिने होकार दिलाय. तू खूप नशीबवान आहेव, राजीव. या परीला तुझ्या आयुष्यात स्थान दिल्याबद्दल आभार. दोघांनाही शुभेच्छा. आता लग्नाची प्रतीक्षा करवत नाहीये. दोन्हींकडून डान्स करायला मी तयार...,’ असे सुश्मिताने राजीव व चारूचा फोटो शेअर करत लिहिले आहे. या फोटोत सुश्मिता व रोहमनही आहेत.

राजीव व चारू गत वर्षभरापासून एकमेकांना डेट करत होते. चारू ही टेलिव्हिजनची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. २००९ मध्ये ‘अगल जनम मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकेतून तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.

‘मेरे अंगने में’ आणि ‘जीजी मां’ या मालिकांमुळे ती लोकप्रिय झाली. सध्या ती ‘विक्रम बेताल’ या मालिकेत काम करतेय. २०१६ मध्ये चारूने नीरज मालवीयसोबत साखरपुडा केला होता.  ‘मेरे अंगने में’ या मालिकेत चारू व नीरज यांनी बहीण-भावाची भूमिका साकारली होती. या सेटवर दोघांत प्रेम झाले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधीच हे नाते तुटले.नीरजसोबत ब्रेकअप झाल्यानंतर चारूच्या आयुष्यात राजीवची एन्ट्री झाली. राजीव हा पेशाने मॉडेल आहे. 

टॅग्स :सुश्मिता सेन