Join us

सुश्मिता सेन म्हणते, सध्या फक्त रोमान्स; लग्नाचा इरादा नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 16:05 IST

तूर्तास सुश्मिताचा लग्नाचा कुठलाही इरादा नाहीये. अर्थात रोहमनसोबत तिचा रोमान्स जोरात आहे. होय, खुद्द सुश्मिताने याचा खुलासा केला आहे.

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा व निक जोनास पाठोपाठ सुश्मिता सेन व रोमन शॉल लग्नबेडीत अडकणार, अशी बातमी आम्ही कालपरवाच तुम्हाला दिली होती. पण तूर्तास सुश्मिताचा लग्नाचा कुठलाही इरादा नाहीये. अर्थात रोहमनसोबत तिचा रोमान्स जोरात आहे. होय, खुद्द सुश्मिताने याचा खुलासा केला आहे.

सुश्मिताने स्वत:चा एक एक्सरसाईज व्हिडिओ शेअर करत, तिच्या व रोहमनच्या लग्नाच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. ‘मी लग्नासाठी तयार होतेय, असा जगाचा कयास आहे पण या सगळ्या बातम्या व्यर्थ आहेत. तूर्तास लग्नाचा कुठलाही इरादा नाही. सध्या रोहमनसोबत रोमान्स सुरू आहे आणि हे सांगणे पुरेसे आहे. मी सत्य काय ते सांगितलेयं. सर्वांना पे्रम...,’ असे सुश्मिताने लिहिलेय. सुश्मिताच्या या पोस्टने एक गोष्ट स्पष्ट झालीय, ती म्हणजे, तूर्तास रोहमनसोबत रोमान्स पुरेसा आहे. कदाचित या नात्याला सुश पुरेसा वेळ देऊ इच्छिते.

सुश्मिता सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण रोमान्स व लूक्सच्या बातम्यांमुळे ती कायम चर्चेत असते. सुश्मिता सिंगल मदर आहे. दोन मुलींना तिने दत्तक घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुश्मिताच्या आयुष्यात रोहमन शॉलने एन्ट्री घेतलीय. सुश्मिता व रोहमन यांच्यातील जवळीक चांगलीच वाढली आहे. एका फॅशन इव्हेंटमध्ये दोघांचीही भेट झाली आणि पुढे दोघेही एकमेकांच्या पे्रमात पडले. अलीकडे सुश व रोहमन दोघेही बिनधास्तपणे फिरताना दिसत आहे. दोघांनीही आपले नाते सार्वजनिक केले आहे.

टॅग्स :सुश्मिता सेन