Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sushma Swaraj Death : सुषमा स्वराज यांच्या निधनाने बॉलिवूडही हळहळले, दिग्गजांनी व्यक्त केला शोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 10:34 IST

सुषमा स्वराज यांच्या निधनाने केवळ राजकारणातच नाही तर बॉलिवूडमध्ये ही शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, अनुपम खेर, सनी देओल, अदनान सामी, सुभाष घई अशा अनेक बॉलिवूड दिग्गजांनी  सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

ठळक मुद्देअनुपम खेर यांनी सुषमा स्वराजसोबत झालेल्या भेटीचे किस्से शेअर केले.

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अखेरचा श्वास घेतला हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.  प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुषमा स्वराज यांच्या निधनाने केवळ राजकारणातच नाही तर बॉलिवूडमध्ये ही शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, अनुपम खेर, सनी देओल, अदनान सामी, सुभाष घई अशा अनेक बॉलिवूड दिग्गजांनी  सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ शेअर केला आहे. 

‘ न्यूयॉर्कमध्ये आहे. बातमी ऐकल्यानंतर स्वत:ला थांबवू शकलो नाही. कारण तुमच्यासोबत माझ्या बºयाच आठवणी आहेत. मी तुमच्यासोबत खूप चांगले क्षण घालवले आहे आणि ही बातमी ऐकल्यानंतर धक्का बसला,’ असे त्यांनी व्हिडीओ म्हटले आहे. यानंतर अनुपम खेर यांनी सुषमा स्वराजसोबतच्या भेटीचे किस्से सुद्धा शेअर केलेत. 

 

अमिताभ यांनी सुषमा स्वराज यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले, ‘अतिशय दु:खद वार्ता. एक अतिशय धडाडीच्या नेत्या, एक मनमिळावू व्यक्तिमत्त्व, एक अद्भूत वक्ता. आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना.’

 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. 

अन्य सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला.

 

 

 

 

 

टॅग्स :सुषमा स्वराजअमिताभ बच्चनअनुपम खेर