Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दिल बेचारा'मधील गाण्याच्या टीझरमधील सुशांतच्या जबरदस्त एन्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, एकदा पाहाच हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 14:10 IST

सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमा दिल बेचाराच्या ट्रेलरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्याच्या गाण्याच्या टीझरलाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

सुशांत सिंग राजपूतचा दिल बेचारा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. दिल बेचाराच्या ट्रेलर एवेंजरसारख्या हॉलिवूड चित्रपटाचाही रेकॉर्ड तोडला आहे. त्यानंतर आता दिल बेचारामधील गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला आहे. दिल बेचारा गाण्याचा टीझर डिस्नी प्लस हॉटस्टारने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत सुशांतची दमदार एन्ट्री दाखवली आहे. सुशांतचा यातील अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.

डिस्नी प्लस हॉटस्टारने दिल बेचाराचे टायटल गाण्याचा टीझर शेअर करत लिहिले की, इथे एक झलक आहे जी मन्नी घेऊन आला आहे आणि किजीला सोडून गेला. ए.आर. रेहमानची जादू सर्वांसाठी घेऊन आलोत.

दिल बेचारामधील या गाण्याच्या व्हिडिओतील सुशांतचा डान्स व अंदाज खूप भावतो आहे. सुशांत सिंग राजपूत व संजना सांघीवर चित्रीत झालेले हे गाणे उद्या रिलीज होणार आहे. या गाण्याच्या टीझरने या चित्रपटाची उत्सुकता आणखीन वाढवली आहे.

दिल बेचारा हा सुशांतचा सिनेमा येत्या 24 जुलै रोजी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसैफ अली खान