Join us

सुशांतच्या वडिलांचा खळबळजनक दावा, त्याच्या सुरक्षेसाठी 25 फेब्रुवारीला मुंबई पोलिसात केली होती तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 20:11 IST

सुशांतचे वडील व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या समोर आले आहेत. त्यांनी या व्हिडिओमध्ये खळबळजनक दावा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये तपासावरून मतभेद सुरू आहे. या दरम्यान आता सुशांतचे वडील व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या समोर आले आहेत. त्यांनी या व्हिडिओमध्ये खळबळजनक दावा केला आहे.सुशांतचे वडील या व्हि़डिओमध्ये म्हणाले की,  25 फेब्रुवारी रोजी सुशांत संकटात असल्याचे मी मुंबई पोलिसांना सांगितले होते. 14 जून रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मी मुंबई पोलिसांनी 25 फेब्रुवारीच्या तक्रारीत दिलेल्या नावांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. मात्र त्याच्या मृत्यूच्या 40 दिवसांनंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर मी पाटण्यात एफआयआर दाखल केला.

पाटण्यात सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत आणि ते या प्रकरणाचा तपास लावत आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी आणि रिया चक्रवर्तीने याबाबत आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी बिहार पोलिसांना मुंबईत तपासाबाबत नकार दर्शवला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. सुशांत आत्महत्येच्या आठवडाभरापूर्वी सतत तीन गोष्टी गुगलवर सर्च करत होता, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे. या तीन गोष्टी कोणत्या तर स्वत:चे नाव, त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियानचे नाव आणि स्वत:चा आजार.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती