सचिनने केले सुशांतच्या क्रिकेटिंग स्किलचे कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 17:23 IST
सध्या बॉलीवूडमध्ये खेळाडूंवर आधारित चित्रपट मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येत आहेत. २०१३ मध्ये राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी मिल्खा सिंग ...
सचिनने केले सुशांतच्या क्रिकेटिंग स्किलचे कौतुक!
सध्या बॉलीवूडमध्ये खेळाडूंवर आधारित चित्रपट मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येत आहेत. २०१३ मध्ये राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ ही बायोपिक बनवली. या बायोपिकचे समीक्षकांनीही खुप कौतुक केले. त्यानंतर एकामागोमाग एक मेरीकॉम, हवाहवाई, अजहर, साला खडूस, सुल्तान आणि आगामी दंगल असे चित्रपट काढण्यास सुरूवात केली. आता लवकरच भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीची संघर्ष कहानीवर आधारित ‘एम.ए.धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात सुशांतसिंग राजपूत यांनी महेंद्रसिंग धोनी यांचा अभिनय केला आहे. आत्तापर्यंत अभिषेक कपूरच्या ‘काय पो चे’ आणि दिवाकर बॅनर्जी यांच्या ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्शी’ हे चित्रपट बनवले. त्यामुळे सुशांतसिंगला धोनीच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले. चित्रपटासाठी सुशांतसिंग राजपूतने प्रचंड मेहनत घेतली आहे. क्रिकेटिंगचे शॉर्ट खेळण्यासाठी ‘बांद्रा कुर्ला स्पोर्टस कॉम्प्लेक्स’ मध्ये खुप घाम गाळला. यादरम्यान, सचिन तेंडूलकर यांनी त्याला तिथे खेळतांना पाहिले. त्याच्या क्रिकेटिंग स्किल्स पाहून तो खुश झाला आणि त्याने किरण मोरे यांना विचारले की, ‘वो लडका किसके लिए खेलता हैं?’ हे जेव्हा सुशांतला कळाले तेव्हा तो म्हणाला,‘ सचिन सरांनी माझी नोंद घेतली एवढेच माझ्यासाठी खुप आहे.’