Join us
Daily Top 2Weekly Top 5

जवळच्यांना गमावण्याची वाटते सुशांतला भीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 16:07 IST

 सुशांतसिंग राजपूत याने ‘महेंद्रसिंग धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. हुबेहुब ...

 सुशांतसिंग राजपूत याने ‘महेंद्रसिंग धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. हुबेहुब धोनी, त्याचे क्रिकेटविश्व, जडणघडण, त्याची जिद्द हे या चित्रपटातून पहावयास मिळणार आहे.पण, सुशांतसिंग राजपूतने नुकतेच एका मुलाखतीत बोलतांना म्हटले आहे की,‘मला माझ्या जवळच्यांना गमवायची भीती वाटते. माझी आई मला लहानपणीच सोडून गेली होती. त्यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. आई मला सोडून गेल्याचे नुकसान कधीही भरून निघणारे नव्हते.त्यामुळे त्यानंतर मला भीती बसली ती माझ्या जवळच्या लोकांना गमवण्याची.’ नुकतीच त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ही त्याला सोडून गेली. त्यांचा नुकताच ब्रेकअप झाला.