Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग राजपूतच्या नोकराने केला त्याच्याबद्दल धक्कादायक खुलासा, गर्लफ्रेंडबद्दल म्हणाला असं काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 15:31 IST

सुशांतच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने रविवारी वांद्रे येथील त्याच्या घरात आत्महत्या केली. 34 वर्षांच्या सुशांतच्या निधनाची बातमी ऐकताच संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सुशांतच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याच्या आत्महत्येचा तपास पोलिसांकडून सुरुआहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांचे स्टेटमेंट घेतले आहे. यात त्याच्या नोकराचाही जबाब नोंदवला आहे.सुशांत सिंग राजपूतच्या नोकाराने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबत त्याचे संबंध तणावाचे होते, असा दावा केला आहे. तसेच सातपैकी सहा चित्रपट हातातून गेल्यानेही तो तणावात होता, तसेच सुशांत आर्थिकदृष्ट्याही संकटात होता, असा दावा त्याच्या नोकराने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात केला आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्याच्या वृत्ताने बॉलिवूडकरांवर शोककळा पसरली आहे. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील पाटणाहून मुंबईत दाखल झाले आहेत. त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार विलेपार्ले येथील स्मशानभूमीत पार पडणार आहे.

सुशांतने त्याच्या सिनेइंडस्ट्रीतील कारकीर्दीत मोजक्याच भूमिका केल्या होत्या. मात्र त्याने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. सुशांतला सर्वांत जास्त लोकप्रियता मिळाली २०१६मध्ये प्रदर्शित झालेला बायोपिक ‘एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातून. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सुशांतने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती आणि या चित्रपटातील सुशांतच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती