Join us

सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे 'या' चित्रपटातून आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 14:39 IST

सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण ...

सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती अंकिताची वर्णी संजू बाबाच्या चित्रपटात लागली आहे. तोरबाजमध्ये संजय दत्तच्या अपोझिट अंकिता लोखंडे झळकणार होती. संजय दत्तच्यासोबत काम करण्याची संधी मिळाणार म्हणून अंकिता सातवे आसमान पर होती. मात्र अंकिताच्या आनंदावर विरजण पडल्यासारखे झाले आहे. कारण अंकिताचे नाव या चित्रपटासाठी अजून फायनल झाले नसल्याचे कळते आहे. तोरबाजचा दिग्दर्शक गिरिश मलिकचे म्हणणे आहे की चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनचे काम अजून सुरु आहे. त्यामुळे कलाकारांची नावं अद्याप फायनल झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या चित्रपटाबाबत एका वेबसाईटशी बोलताना मलिक म्हणाला की, ''सध्या तोरबाजच्या प्री-प्रोडक्शनच्या काम आम्ही करतो आहे. अंकिताला मी  ओळखत नाही तसेच या चित्रपटासाठी आतापर्यंत फक्त संजय दत्तचे नावचं फायनल करण्यात आला आहे. त्याच्याशिवाय चित्रपटाची इतर स्टारकास्ट अजून फायनल करण्यात आलेली नाही.   तोरबाज चित्रपटाची कथा अफगाणिस्तानमध्ये लहान मुलांना बनवण्यात येणाऱ्या सुसाईड बॉम्बरबद्दलची आहे. 2017च्या डिसेंबर महिन्यात या चित्रपटाची शूटिंग सुरु करण्यात येणार आहे. संजय दत्त लवकरच भूमि या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून  वडील-मुलीच्या हळूवार नात्यावर भाष्य करण्यात आले आहे. ज्यावेळी या चित्रपटाची कथा संजूबाबाने ऐकली होती त्यामुळे तो अतिशय भावूक झाला होता. तोरबाजचा दिग्दर्शक मलिक यांनी  2013मध्ये तयार केलेल्या जल चित्रपटासाठी ओळखले जाते. कारण त्यांच्या या चित्रपटाला स्पेशल इफेक्ट्स राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.