Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडेला दिली जाणार पोलिस सुरक्षा? कुणापासून आहे धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 12:36 IST

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू या जगातून गेला पण जाताना अनेक प्रश्न मागे ठेवून गेला...

ठळक मुद्दे अंकिताने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू या जगातून गेला पण जाताना अनेक प्रश्न मागे ठेवून गेला. मुंबई पोलिसांसोबतच बिहार पोलिसही या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. तूर्तास एक मोठी बातमी म्हणजे, सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिला पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाणार असल्याचे कळतेय.

 मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिका-याने याबाबतची माहिती दिली आहे.  अंकिता लोखंडेला नेमका कुणापासून धोका आहे? हे माहित नाही. पण अंकिताला सुरक्षा पुरवली जाणार असल्याचे ऐकून या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे.

सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केल्यानंतर बिहार पोलिस या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करत आहेत. बिहार पोलिसांनी अंकिताचाही जबाब नोंदवला आहे. आत्तापर्यंत पाटणा पोलिसांनी सुशांतचा जवळचा मित्र महेश शेट्टी, त्याचा कुक आणि सुशांतची बहीण मितू सिंग यांचा जबाब नोंदवला आहे.

रिया त्याचा त्रास द्यायची...सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी देखील जबाब नोंदवण्यासाठी बिहार पोलीस गेले असता या जबाबात अंकिताने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.गोरेगाव येथील अंकिताच्या राहत्या घरी बिहार पोलिसांनी  तिचा जबाब नोंदवला. यावेळी सुशांतची गर्लफ्रेंड रिया ही त्याला खूप त्रास द्यायची, याबाबत सुशांतने स्वत: तिला सांगितले होते, असे अंकिताने बिहार पोलिसांना सांगितले कळतेय. ‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुशांतने आपल्याला फोन केला होता. यावेळी त्याने माझे अभिनंदन केले होते. त्यानंतर तो रिया बद्दल बोलत होता. रिया मला खूप त्रास देते. तिच्या सोबतच्या रिलेशनमध्ये मला रहायचे नाही. मला तिच्या पासून दूर व्हायचे आहे. मला काही सुचत नाही, असे सुशांत म्हणाल्याचे अंकिताने पोलिसांना दिली. त्यामुळे आता अंकिताच्या या जबाबानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवे वळण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूत