Join us

‘द फॅमिली मॅन’च्या जेके तळपदेचे सुशांत सिंग राजपूतच्या निधनामुळे 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 20:52 IST

. ‘द फॅमिली मॅन-२’ च्या यशानंतर अभिनेता शारिबने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या करिअरमधील काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

द फॅमिली मॅनच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या वेबसीरिजमधील मनोज वाजपेयीसोबतच राजीची भूमिका साकारणाऱ्या समंथा अक्किनेनीचेही खूप कौतुक झाले. सीरिजमधील प्रत्येक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. यापैकी आणखी एक पात्र म्हणजे श्रीकांत तिवारीचा सहकारी, त्याचा जीवाभावाचा मित्र आणि त्याच्या प्रत्येक मिशनमध्ये त्याच्या सोबत असणारा जेके तळपदे. जेके म्हणजेच अभिनेता शारिब हाशमीच्या कामाचाही सर्वत्र कौतुक होते आहे. ‘द फॅमिली मॅन-२’ च्या यशानंतर अभिनेता शारिबने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या करिअरमधील काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

या मुलाखतीत शारिब हाश्मीने त्याच्या एका अपूर्ण स्वप्नाबद्दल सांगितले. तो म्हणाला की, “माझ्या एका चित्रपटाचे फिल्मीस्तानमध्ये स्क्रीनिंग होते. त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबतच सुशांत सिंग राजपूतदेखील तिथे आला होता. मी त्याच्या शेजारच्याच खुर्चीत बसलो. तो चित्रपट पाहताना मध्ये मध्ये हसत होता. सिनेमा संपताच त्याने मला मिठी मारली आणि माझे कौतुकही केले. सुशांत तेव्हा लोकप्रिय अभिनेता होता. तरीदेखील तो खूप विनम्र होता. मला आजही त्याचा हसरा चेहरा आठवतोय.

पुढे शारिबने सांगितले की ‘तकदूम’ नावाचा एक चित्रपट येणार होता. यात सुशांत आणि परिणीती चोप्राची जोडी झळकणार होती. यात शारिबदेखील एक महत्वाची भूमिका बजावणार होता.मात्र काही कारणांमुळे या प्रोजेक्टचे काम रखडले आणि चित्रपट होऊ शकला नाही. त्यानंतर सुशांतने देखील या जगाचा निरोप घेतला.

त्यामुळे शारिबचे सुशांतसोबत काम करण्याचे स्वप्न कायमचे अपूर्ण राहिले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतमनोज वाजपेयीसमांथा अक्कीनेनी