Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिया चक्रवर्तीने सुशांतला घातलाय लाखों रूपयांचा गंडा,सुशांतच्या कुकने उघकीस आणली ही धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 16:13 IST

रियाने खार आणि नवी मुंबई येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये दोन फ्लॅट घेतले आहेत.

सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतच्या वडिलांनी पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी रिया, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, दोन मॅनेजर सौमिल चक्रवर्ती आणि श्रुती मोदी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला. सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबावर सुशांतचे पैसे हडपल्याचा आरोप केला आहे.तसेच अधिक तपासातही एक धक्कादायक बा समोर आली आहे.  एक दिवस रिया चक्रवर्ती सुशांतच्या समोर बसली होती. दरम्यान, त्याने आपल्या खात्यातून काढण्यात येणा-या पैशांचा उल्लेख केला. सुशांत रियाला थेट न बोलता कुकला म्हणाला की, तुम्ही लोक खूप पैसे खर्च करत आहात. खर्च जरा कमी करा. रियाने हे सर्व ऐकले होते.

चौकशी दरम्यान रिया म्हणाली की, सुशांतने तिच्यावर जे पैसे खर्च केले ते स्वमर्जीने केले होते. मात्र जेव्हा रियाला तिच्या स्वतःच्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्चाबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा ती योग्य उत्तरे देऊ शकली नाही. रियाने कोणतीच गोष्ट लपवली नाही असे रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी म्हटले आहे.

रियाने खार आणि नवी मुंबई येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये दोन फ्लॅट घेतले आहेत. यातील खारमधील घर जवळपास 85 लाख रुपयांचे असून त्यासाठी रियाने 25 लाखांचे डाऊनपेमेंट केले होते. तर 60 लाखांचे होम लोन घेतले होते. हा फ्लॅट 550 स्क्वेअर फिटचा आहे. तर दुसरा फ्लॅट 2012 मध्ये घेतला होता आणि 2016 मध्ये या घराचा ताबा मिळाला होता.या फ्लॅटची किंमत 60 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

रिया चक्रवर्तीचा कॉल डिटेल रेकॉर्ड समोर आला आहे. रेकॉर्डनुसार, रिया दोन सायकॅट्रिस्टच्या संपर्कात होती. महेश भट्ट यांच्याशी तिने अनेकदा बोलणे झाले होते.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती