Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग राजपूतला बनायचे होते क्रिकेटर, देशासाठी खेळायचे त्याचे हे स्वप्न राहिले अधुरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 15:37 IST

सुशांत हा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा खूप मोठा चाहता होता.

बॉलिवूडमध्ये आपल्या रोमँटिक अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या सुशांतसिंग राजपूतला क्रिकेटच्या पिचवर आपली जादू दाखवायची होती. सुशांत एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की त्याला क्रिकेटर बनयाचे होते. भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी तो इतर कोणतेही काम करायचा नाही. त्याची भारतीय संघातून खेळण्याची इच्छा होती. पण घरातला सर्वात धाकटा आणि एकुलता एक मुलगा असल्याने तो ही जोखीम घेऊ शकत नव्हता, त्यामुळे त्याला क्रिकेट सोडावे लागले. सुशांतची बहीण त्याची बहीण मीतू राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे.

तो आठवीत असताना क्रिकेटमध्ये करिअर करावे असा विचार डोक्यात यायचा पण कौटुंबिक दबावामुळे ते करू शकले नाहीत. त्याला कुटुंबाच्या अपेक्षांवर खरे उतरायचे होते हाच तो क्षण होता ज्यामुळे सुशांत क्रिकेटचा विचार सोडून इंजिनिअरकडे वळला. यानंतर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असताना तो अभिनयाकडे वळला. मात्र तरीही त्याचे क्रिकेटवरील प्रेम कमी झाले नाही. 

सुशांत हा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा खूप मोठा चाहता होता आणि तो जवळपास 10 वर्षांपासून त्याच्या खेळाला फॉलो करत होता. ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीची भूमिका करण्यासाठी सुशांतने प्रचंड मेहनत घेतली होती. यात त्याने महेंद्र सिंग धोनीची भूमिका साकारली होती. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत