Join us
Daily Top 2Weekly Top 5

रियाला डेट करण्याच्या प्रश्नावर हे काय म्हणाला सुशांत सिंग, आता यावर काय असेल रियाचं रिअॅक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 06:00 IST

सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रबर्तीच्या रिलेशनशीपची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून बी-टाऊनमध्ये आहे.

सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रबर्तीच्या रिलेशनशीपची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून बी-टाऊनमध्ये आहे. दोघांनी लद्दाखमध्ये काही दिवसांपूर्वीच व्हॅकेशन एन्जॉय करुन आले आहेत. दोघांचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आजतकच्या रिपोर्टनुसार सुशांतने त्याच्या अफेअरला घेऊन एक वक्तव्य केले आहे. एका मुलाखती दरम्यान सुशांत म्हणाला, ऐवढ्या लवकर याबाबत काही बोलणं ठिक नाही. मी फक्त माझ्याशी रिलेडेट गोष्टींवर बोलणं पसंत करतो. जर गोष्ट आणखी कुणाची असेल तर त्यावर बोलण्या आधी मी विचार करतो.

 रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. 'दोबारा' ,  'हाफ गर्लफ्रेन्ड', ' बँक चोर'  अशा अनेक सिनेमात ती झळकली आहे.

 रियाच्या आधी सुशांतचे अफेअर क्रिती सॅननशी जोडण्यात आले होते. मात्र त्याचे हे नातं ही फारकाळ टिकले नाही. क्रितीच्या आधी सुशांतचे अफेअर अंकिता लोखंडे सोबत होते. पवित्र रिश्ताच्या सेटवर दोघांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झालं. ते दोघे अनेक वर्षं नात्यात होते. पण त्यांनी काही वर्षांपूर्वी ब्रेकअप केले. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, सुशांत लवकरच 'छिछोरे'मध्ये दिसणार आहे. या सिनेमाची कथा मजेशीर असून या पोस्टरवर 'कुत्ते की दुम टेढ़ी, टेढ़ी की टेढ़ी' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. नितेश तिवारी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत