भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामींच्या या संदर्भातील पत्राची दखल घेतल्याचे कळतेय. सुशांतच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी विनंती स्वामींनी मोदींना एका पत्राद्वारे केली होती. मोदींनी स्वामींच्या या पत्राची दखल घेतल्याने आता सुशांत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शक्यता वाढली आहे.
स्वामींचे सहकारी व वकील इशकरण सिंह भंडारी यांनी यासंदर्भात दोन ट्विट केलेत. सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करणारे पत्र स्वामींनी पीएम मोदींना लिहिले होते. मोदींनी या पत्राची दखल घेतली आहे, अशी माहिती भंडारींनी पहिल्या टिष्ट्वटमध्ये दिली आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीकरता सर्व आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी एका वकिलाची नियुक्ती केली आहे. ही माहिती खुद्द त्यांनीच ट्विटरवर दिली होती.
काय लिहिले पत्रात?स्वामींनी 15 जुलैला मोदींना पत्र लिहिले होते. असोसिएट इन लॉ इनकरण सिंह भंडारी यांनी केलेल्या रिसर्चचा हवाला देत त्यात त्यांनी लिहिलेय, ह्यमाझे असोसिएट इन लॉ इनकरण सिंह भंडारी यांनी सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येसंदर्भात काही रिसर्च केला आहे. तुम्हाला सुशांतच्या अकाली निधनाबद्दल माहित असेलच. पोलिस अद्यापही या प्रकरणाचा तपास करत आहेत. मी मुंबईतील आपल्या काही सूत्रांकडून ऐकलेय की, या प्रकरणात दुबईतील डॉनशी संबंधित बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही मोठे लोक सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या सिद्ध करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत आहेत.ह्ण