Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हा' खेळ खेळताना सुशांत सिंग राजपूतने शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 15:00 IST

सुशांत सिंग राजपूत सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. तो नेहमीच आपल्या चाहत्यांबरोबरचे फोटो शेअर करत असतो. सध्या त्याने त्याचा ...

सुशांत सिंग राजपूत सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. तो नेहमीच आपल्या चाहत्यांबरोबरचे फोटो शेअर करत असतो. सध्या त्याने त्याचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे त्यात तो वेगळ्या अंदाजात दिसतोय. सुशांत सिंगच्या या फोटोमध्ये तो नेमबाजी करताना दिसतो आहे. हा फोटो शेअर करताना सुशांतसिंगने 'अर्जुन और आँख' असे लिहिले आहे पण या व्हिडिओमधून हे अजून स्पष्ट झाले नाही आहे की तो नेमबाजी कोणत्या चित्रपटासाठी शिकतोय की सहज. त्याची ही नवीन स्टाईल पाहुन त्याचे चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.येणाऱ्या काळात सुशांतसिंग दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या केदारनाथ ह्या चित्रपटात सारा आली खान बरोबर  दिसणार आहे.हा चित्रपट २०१३ मध्ये ‘केदारनाथ’मध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो. 'केदारनाथ’ हा चित्रपट एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे.  ह्या व्यतिरिक्त तो "सोन चिरैया' या चित्रपटात झळकणार आहे, ह्या चित्रपटातील त्याचा लूक त्याने काही दिवसांपूर्वी ट्विटर वर शेअर केला होता त्यात तो एक डाकू च्या वेशात दिसत होता, हा चित्रपट चंबल च्या डाकू वर आधारित आहे.त्याचबरोबर सुशांतसिंग संजय पुरन सिह चौहान च्या 'चंदा मामा दूर के' ह्या चित्रपटात अंतराळवीर ची भूमिका साकारत आहे. सुशांतसिंग राजपूत दंगल फेम दिग्दर्शक नितेश तिवारी च्या आगामी चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर बरोबर दिसण्याची  शक्यता आहे.