सुशांतसिंग राजपूतने म्हटले, ‘शून्य ग्रॅव्हिटी’चा अनुभव घेण्यास उत्सुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2017 18:24 IST
लवकरच अभिनेता सुशांतसिंग राजपूत त्याच्या आगामी ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. चित्रपटात तो अंतराळवीराची ...
सुशांतसिंग राजपूतने म्हटले, ‘शून्य ग्रॅव्हिटी’चा अनुभव घेण्यास उत्सुक!
लवकरच अभिनेता सुशांतसिंग राजपूत त्याच्या आगामी ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. चित्रपटात तो अंतराळवीराची भूमिका साकारणार आहे. त्याच्या भूमिकेविषयी बोलताना सुशांतने म्हटले की, शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेण्यास आणि न्यूटनच्या गतीचा सिद्धांत जवळून अनुभवण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे. मी हे सगळं विद्यार्थीदशेत असताना अभ्यासलं होतं, असेही सुशांतने सांगितले. यासाठी तो अमेरिकेच्या ‘नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस सेंटर (नासा) चा दौरा करणार आहे. ‘आयएएनएस’ने जेव्हा सुशांतला त्याच्या नासा जाण्याच्या योजनेविषयी विचारले तेव्हा त्याने सांगितले की, ‘मी तो अनुभव घेण्यासाठी खूपच उत्सुक आहे. आयुष्यातील सुरुवातीचे १८-१९ वर्ष मी (आयजॅक) न्यूटन आणि (अल्बर्ट) आइन्स्टन यांचे सिद्धांत अनुभवले. आता पहिल्यांदा जवळून हे सगळं काही बघणार अन् अनुभवणार आहे. थोडक्यात आतापर्यंत जे माझ्या डोक्यात होतं ते आता मी प्रत्यक्ष बघणार आहे. याठिकाणी जाऊन मी पहिल्यांचा शून्य गुरुत्वाकर्षणचा अनुभव घेणार आहे आणि चंद्रावर चालण्याचा अनुभव नेमका कसा असतो, हेदेखील जाणून घेणार आहे. सुशांतने पुढे बोलताना म्हटले की, आतापर्यंत पुस्तकात वाचलेलं हे सर्व काही मी जवळून अनुभवणार असल्याने याविषयी मी खूपच उत्साहित आहे. संजय पुरनसिंग चौहान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटात सुशांत व्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दिकी आणि आर. माधवन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सुशांत बॉक्सिंग लीगचा भाग बनण्यासाठी गेल्या शुक्रवारी राजधानी दिल्लीत होता. सुशांत ‘दिल्ली-ग्लॅडिएटर्स’ या संघाचा मालक आहे. यावेळी त्याला त्याच्या ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटाविषयी विचारले होते. त्यानेदेखील मनमोकळ्या गप्पा मारताना सर्व माहिती दिली. आता या चित्रपटात सुशांत नेमका काय करिष्मा दाखविणार, हे बघणे मजेशीर ठरणार आहे.