बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत एकेकाळी टीव्हीवरचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता होता. ‘किस देश मे है मेरा दिल’ या मालिकेतून सुशांतने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख दिली ती एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने. २००९ मध्ये आलेल्या या मालिकेत सुशांतने मानव देशमुखची भूमिका साकारली होती. ही मालिका प्रेक्षकांनी इतकी डोक्यावर घेतली की, हा शो सुशांतच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला. या शोने दिलेल्या लोकप्रियतेच्या बळावरच सुशांतची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. त्यामुळे सुशांत आजही एकता कपूरचा प्रचंड आदर करतो. इतका की, एकता जे म्हणेल ते मी करेल, असे सुशांत म्हणतो.
सुशांत सिंग राजपूत-एकता कपूरचा ‘पवित्र रिश्ता’; म्हणे एकता जे सांगेल ते मी करेल!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 06:00 IST
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत एकेकाळी टीव्हीवरचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता होता. ‘किस देश मे है मेरा दिल’ या मालिकेतून सुशांतने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख दिली ती एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने.
सुशांत सिंग राजपूत-एकता कपूरचा ‘पवित्र रिश्ता’; म्हणे एकता जे सांगेल ते मी करेल!!
ठळक मुद्दे लवकरच ‘छिछोरे’ आणि ‘दिल बेचारा’ हे सुशांतचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.