Join us
Daily Top 2Weekly Top 5

रियासोबतच्या लग्नाच्या चर्चेवर सुशांतने सोडले मौन, म्हणाला की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 15:35 IST

सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रबर्तीच्या रिलेशनशीपची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून बी-टाऊनमध्ये आहे.

सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रबर्तीच्या रिलेशनशीपची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून बी-टाऊनमध्ये आहे. सुशांत सिंग राजपूत या नात्याला एक पाऊल पुढे न्यायचं होते. दोघांच्या लग्नाच्या चर्चेने जोर पकडला होता. मात्र या प्रकारणावर सुशांतने अखेर मौन तोडले आहे.   टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, या संदर्भातला प्रश्न जेव्हा सुशांतला विचारण्यात आला यावर तो हसून म्हणाला, ही निव्वळ अफवा आहे. सध्या मी याप्रकारच्या न्यूज वाचणं बंद केले आहे.     

रिपोर्टनुसार सुशांतला त्याची प्लेबॉय वाली इमेज काढून टाकण्यासाठी त्याला रियासोबत लग्न करायचं आहे. सुशांत लग्नासाठी एका पायावर तयार असला तरी रिया मात्र या लग्नासाठी तयार नाही. मात्र सुशांतने याला अफवा असल्याचे सांगितले आहे.   

अलीकडे एका मुलाखतीत सुशांतने रिया व त्याच्या रिलेशनशिपबद्दल बोलण्यास नकार दिला होता. ‘मी याबद्दल काहीही सांगणार नाही. मला याबद्दल बोलण्यास मनाई करण्यात आलीय, असे नाही. पण मी स्वत:च स्वत:ला याबद्दल बोलण्याची परवानगी दिलेली नाही. माझ्या मते, खुलासा करण्याची योग्य वेळ अद्याप आलेली नाही,’ असे तो म्हणाला होता.

रियापूर्वी सुशांत अंकिता लोखंडेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांचे रिलेशनशिप अगदी लग्नापर्यंत पोहोचले होते. पण अनेक वर्षे सोबत राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर सुशांत व क्रिती सॅननच्या रोमान्सच्या चर्चा रंगल्या. क्रितीमुळे सुशांत व अंकिताचे ब्रेकअप झाले, असेही म्हटले गेले. पण कालांतराने हे नातेही संपले. आता सुशांत रियाच्या प्रेमात वेडा झाला आहे. त्याचे हे नाते किती यशस्वी होते, ते पाहणे आता इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती