Join us

सुशांत सिंग राजपूतची पाटण्यामधील घरी झाली प्रार्थना सभा, समोर आला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 13:17 IST

या प्रार्थना सभेत रिया चक्रवतीला सहभागी होण्यास कुटुंबीयांना आधीच नकार दिला होता.

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडच नाही तर अख्ख्या देशाला हादरवून सोडले. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील घराणेशाही जबाबदार आहे. बॉलिवूडच्या काही लोकांनी सुशांतचे करिअर पद्धतशीरपणे संपवले, असा आरोप होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे तर दुसरीकडे सुशांतच्या पाटणामधील घरी कुटुंबीयांनी शोकसभा ठेवली होती. या प्रार्थनासभेतील फोटो समोर आला आहे. 

सुशांतच्या निधनानंतर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुशांतचे अंतिम संस्कार झाल्यानंतर कुटुंबीय पाटणाला परतले. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार सुशांतला ओळखणारे बरेच लोक या प्रार्थना सभेला पोहोचले होते. या प्रार्थना सभेत रिया चक्रवतीला सहभागी होण्यास कुटुंबीयांना आधीच नकार दिला होता. सुशांतच्या शोकसभेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. मानव मंगलानीने शेअर केलेल्या फोटो सुशांतचे फॅन्स कमेंट्सच्या माध्यमातून आपले दु:ख व्यक्त करतायेत. 

सुशांत एक लोकप्रिय अभिनेता होता. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुशांतने छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘किस देश में हे मेरा दिल’ ही त्याची पहिली मालिका होती. यानंतर एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतला संधी मिळाली आणि या एका संधीने त्याचे आयुष्य बदलले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत