Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दिल बेचारा’च्या सेटवर घडत होत्या विचित्र गोष्टी...! सुशांतची को-स्टार संजना सांघीला आता आठवू लागले सर्व काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 16:42 IST

सुशांत सिंग राजपूतचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’च्या हिरोईनचा धक्कादायक खुलासा

ठळक मुद्देमी मुकेश छाब्रांना भेटून या सगळ्या गोष्टी शेअर करू इच्छिते, असेही संजनाने सांगितले.

सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या का करावी? हा प्रश्न प्रत्येकाला छळत आहे. सुशांतच्या चाहत्यांनाच नाही तर त्याच्या को-स्टार्सलाही सुशांत आज या जगात नाही, यावर विश्वास ठेवणे कठणी जातेय. ‘दिल बेचारा’ या सुशांतच्या अखेरच्या सिनेमाची हिरोईन संजना सांघी यापैकी एक, आता संजनाने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत काही विचित्र घटनांचा उल्लेख केला आहे. होय, ‘दिल बेचारा’च्या सेटवर काहीतरी विचित्र घडत होते, त्याबद्दल तिने सांगितले आहे.

संजनाने सांगितले की, आज त्या गोष्टी आठवल्या की, मला स्वत:ला विचित्र वाटते. ‘दिल बेचारा’च्या शूटींगवेळी काहीतरी विचित्र घडत होते. जेव्हा केव्हा मी किंवा सुशांत एखादा इमोशनल वा हेवी सीन करायचो त्यावेळी आम्हा दोघांपैकी एकाची तब्येत बिघडायची.   माझ्या कलाकार मित्रांसोबतही असे घडते की नाही मला माहित नाही. पण सुशांतसोबतही हे घडत होते. सीनवेळी कधी ताप, कधी सर्दी, कधी नाकातून रक्त वाहणे  सगळे व्हायचे आणि सीन झाल्यानंतर अचानक सगळा त्रास बंद व्हायचा.

यावेळी संजनाने स्मशानभूमीतील एका सीनचाही उल्लेख केला. तिने सांगितले, ‘आम्ही पॅरिसमध्ये एका स्मशानभूमीत शूटींग करत होता. एक अतिशय भावूक सीन होता. सुशांतचा क्लोजअप सीन होता आणि माझा क्लोजअप सीन देऊन झाला होता. मला फक्त सुशांतच्या समोर उभे व्हायचे होते. जानेवारीची थंडी होती. सीन सुरू असतानाच अचानक अचानक सुशांत मला इशारा करू लागला. तो काय म्हणतोय,  हे मला समजत नव्हते. त्याने तो सीन तिथेच थांबवला. कारण माझ्या नाकातून रक्त वाहत होते आणि मला माहितही नव्हते. सुशांतनेच मला रूमाल दिला. यानंतर बर्फ मागवला गेला. त्या घटनेने सगळेच घाबरले होते. आज त्या घटना आठवल्या की, काहीसे विचित्र जाणवते.’मी मुकेश छाब्रांना भेटून या सगळ्या गोष्टी शेअर करू इच्छिते, असेही संजनाने सांगितले. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत