Join us

Dil Bechara Trailer VS Avengers Endgame: सुशांत सिंग राजपूतच्या 'दिल बेचारा'च्या ट्रेलरने 1 दिवसात तोडला एवेंजर्स: इंफिनिटी वॉर एंडगेमचा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 13:24 IST

भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक पसंतीचा ट्रेलर दिल बेचारा बनला आहे.

अभिनेता सुशांत सिंगचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात  सुशांत सोबत संजना सांघी मुख्य भूमिकेत आहे. सोमवारी दुपारी 4 वाजता सिनेमाचा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला रिलीज होताच 3.7 मिलीयन लाईक्स मिळाले आहेत. 24 तासाच्या आता ट्रेलर यूट्यूबवर 4.5 मिलियन लाईक्स मिळाले आहेत आणि याचसोबत दिल बेचाराने  हॉलिवूड ब्लॉकबस्टर सिनेमा एवेंजर्स: इंफिनिटी वॉर एंडगेमच्या ट्रेलरचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, एवेंजर्स: इंफिनिटी वॉरला 3.6 मिलियन लाईक्स मिळाले होते. याच सोबत  भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक पसंतीचा ट्रेलर दिल बेचारा बनला आहे.

दिल बेचारा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच पसंतीस उतरला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सुशांतच्या अभिनयाचे कौतुक करताना त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. ट्रेलरच्या रेकॉर्डकडे पाहता असे दिसते की प्रेक्षक ज्या पद्धतीने या सिनेमावर प्रेम दाखवत आहेत, हा चित्रपट येत्या काळात असे आणखी कितीतरी विक्रम करेल. 

लॉकडाऊनमुळे हा सिनेमा OTT प्लॉटफॉर्मवर रिलीज होणार आहे. डिज्नी हॉटस्टरवर हा सिनेमा 24 जुलै 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची कथा विनोद आणि रोमान्स भोवती फिरताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे. शिवाय २०१२ साली प्रकाशित झालेल्या जॉन ग्रीन यांच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' कादंबरीवर सिनेमाची कथा आधारित आहे. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअ‍ॅवेंजर्स- एंडगेम