Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सुशांत सिंग राजपूत, क्रिती सेनन यांचे स्पेशल न्यू इयर सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 18:21 IST

मागील वर्षी एम.एस. धोनी : अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाच्या यशामुळे व अंकिता लोखंडेसोबतच्या ब्रेकअपमुळे सुशांत सिंग राजपूतने मीडियामध्ये चांगलीच ...

मागील वर्षी एम.एस. धोनी : अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाच्या यशामुळे व अंकिता लोखंडेसोबतच्या ब्रेकअपमुळे सुशांत सिंग राजपूतने मीडियामध्ये चांगलीच चर्चा मिळविली. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सुशांत सिंगची एका अभिनेत्रीसोबत जवळीक चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्री क्रिती सेननसोबत त्याने साजरे केलेले न्यू इयर सेलिब्रेशन सध्या मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. एम.एस. धोनी या चित्रपटाच्या यशाचा जल्लोष साजरा करीत त्याने अभिनेत्री क्रिती सेनन सोबत न्यू इयरचे सेलिब्रेशन धूम धडाक्यात केले. यावेळी त्याच्यासोबत निर्माता दिनेश विजनदेखील सोबत होता. दिनेश विजन याच्या आगामी चित्रपटात क्रिती व सुशांत प्रमुख भूमिका करीत असल्याचे सांगण्यात येते. मात्र असेही मानले जाते की, अंकिता लोखंडेच्या ब्रेकअप मागे क्रिती सेननशी त्याची निर्माण झालेली जवळीक हे आहे. क्रिती व सुशांत यांनी आपल्या अफेअरच्या बातम्या नेहमीच खोट्या ठरविल्या आहेत. मात्र आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत असे दोघांनी कबुल केले आहे. काही दिवसांपूर्वी सुशांत सिंग राजपूत व क्रिती सेनन यांचा एका पार्टीतील फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. यात दोघेही इंटिमेट झाल्याचे दिसत होते. या सोबतच त्यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरील काही     फ ोटो व्हायरल झाले होते. यावेळी दोघांनी आमच्या दोघांची या चित्रपटात चांगली केमिस्ट्री जुळून आली आहे, आमची केमिस्ट्री जुळेल तेव्हाच आम्ही भूमिकेला योग्य न्याय देऊ, असा खुलासा दोघांनी केला होता. सुशांत सिंग राजपूत त्यावेळी म्हणाला, ‘चित्रपटात मी क्रितीवर प्रेम करीत आहे, हे दाखविणे सत्य असल्यासारखे दाखवावे लागणार आहेच, त्यात ती गोष्ट दिसायला हवी ना, आमच्या आॅफस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल बोलणार असाल तर आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. क्रिती दरवर्षी न्यू इयरचे सेलिब्रेशन आपल्या आई-वडिलांसह साजरा क रीत आली आहे. मात्र, यंदा तिच्या पालकांना मुंबईला जायचे होते. वेल काहीही असो क्रितीने आपल्या खास मित्रासोबत नव्या वर्षाचा जल्लोष साजरा केला हे तेवढेच खरे.