Join us

अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड विक्की जैनची आधीच घेतली होती सुशांत सिंग राजपूतने भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 18:25 IST

अंकिता आणि विक्कीची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती.

सुशांत सिंग राजूपत आणि अंकिता लोखंडेची लव्हस्टोरी पवित्र रिश्ताच्या सेटवर सुरु झाली होती. दोघांची ओळख या मालिकेच्या दरम्यान झाली होती. पहिली दोघांमध्ये मैत्री झाली या मैत्रिचे रुपांतरनंतर प्रेमात झाले. प्रेक्षकांना देखील त्यांची जोडी आवडली होती. सात वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताला धक्का बसला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी तिच्या आयुष्यात विक्की जैनची एंट्री झाली. 

सोशल मीडियावर एका फोटो व्हायरल होतो आहे ज्यात सुशांत आणि विक्की काही मित्रांसोबत एकत्र दिसतायेत. या फोटोत सुशांत आणि विक्कीसह नंदीश संधू, अर्जुन बिजलानी आणि मृणाल जैनसुद्धा आहेत. 

अंकिता आणि विक्कीची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. काही भेटीनंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. अंकिता विक्कीसोबतचे रोमाँटीक फोटो शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वी अंकिताने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, लॉकडाऊनमध्ये ती विक्कीला मिस करतेय. विकी जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे. कंगना रानौतची मुख्य भूमिका असलेला चित्रपट मणिकर्णिका चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडे