Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिया चक्रवर्तीने का केले सुशांतची बहीण प्रियंकाला टार्गेट?, गणेशने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 14:34 IST

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीने अलिकडेच आपलं मौन सोडले आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीने अलिकडेच आपलं मौन सोडले आहे. रियाने सुशांतच्या कुटुंबीयांवरट अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात रिया सुशांतची बहीण प्रियंकाचे नाव वारंवार घेते आहे. यावर सुशांतचा मित्र कोरियोग्राफर  गणेश हिवारकरने अनेक खुलासे केले आहेत. गणेशने सांगितले की रियाने या प्रकरणात प्रियंकाचे नाव का आणले. 

न्यूज 18च्या रिपोर्टनुसार गणेश आणि सुशांत एकमेकांना 12 वर्षांपासून ओळखतात. एका मुलाखती दरम्यान गणेशने सांगितले, सुशांतच्या मॅनेजरनंतर त्याची बहीण प्रियंका त्याचे निर्णय घ्यायची, रियाला ही गोष्ट खटकायची. त्यासाठी तिने प्रियंका दीदीवर शारिरीक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप लावला. जेणेकरुन तिला प्रियंकाला बाजूला करता येईल. सुशांतचे अकाऊंट तिच हँडल करायची. बिझनेस डीलसुद्धा तिचं फायनल करायची. त्याबरोबर ती अकाउंट नॉमिनीदेखील होती. 

रियाने केले प्रियंकावर आरोपरियाने सांगितले की, सुशांतसोबतच्या नात्याची सुरुवात झाल्यानंतर घरी राहायला गेले होते. त्यावेळी सुशांतची बहीण प्रियंका आणि तिचा पती सिद्धार्थ सुशांतसोबतच राहत होते. एप्रिल 2019 च्या एका रात्री रिया आणि प्रियंका एका पार्टीत गेल्या होत्या. त्यावेळी प्रियंकाने प्रमाणापेक्षा जास्त मद्याचे सेवन केले होते. नशेत प्रियंका पुरुष आणि महिलांसोबत विचित्र चाळे करत होती. दुसऱ्या दिवशी शूटिंगला जायचे असल्यामुळे मी त्या पार्टीतून लगेच निघून गेली. पण पार्टीमध्ये प्रियंका मद्याचे सेवन करत होती. मी घरी आल्यानंतर सुशांतच्या बेडवर झोपले होते. रात्री मला अचानक जाग आली तेव्हा बेडवर प्रियंका झोपली होती आणि ती मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होती. हे सर्व पाहून रिया घाबरली आणि तिने तिला खोलीतून बाहेर जाण्यास सांगितले. या घटनेनंतर रिया सुशांतच्या घरातून निघून गेली. त्यानंतर रियाने सुशांतला याबद्दल सांगितले.

अखेर रिया चक्रवर्तीने CBI समोर महेश भट यांच्यासोबतच्या नात्याबद्दल तोडली चुप्पी 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती