Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग राजपूतची बहिण मीतू सिंगच्या विरोधात एफआयआर दाखल, रियाने केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 15:53 IST

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणींच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणींच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. सोमवारी मुंबई हायकोर्टाने सुशांत सिंग राजपूतची बहिण मीतू सिंगच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. दुसरी बहिण प्रियंकाच्या विरोधातील एफआयआर फेटाळून लावले आहे.

एफआयआरमध्ये सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मागील सुनावणीमध्ये कोर्चात दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. रियाने आपल्या तक्रारीत सुशांतची बहिण प्रियंका आणि मीतू सिंगवर आरोप केला होता की त्यांनी दिल्लीतील एक डॉक्टर तरूण कुमारला भेटले होते आणि त्याच्या मानसिक स्थितीबद्दल माहिती न घेता सुशांतसाठी प्रीस्क्रिप्शन दिले होते.

रियाने सांगितले होते की, सुशांतला ८ जूनला ड्रग्स दिले होते आणि त्याने १४ जूनला आत्महत्या केली होती. रियाने डॉक्टर तरूण आणि सुशांतच्या दोन्ही बहिणींवर आत्महत्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. सुप्रीम कोर्टाने १९ ऑगस्टला सीबीआयला निर्देश दिले होते की, ते या प्रकरणी महाराष्ट्र आणि बिहारच्या सरकारमधील राजकीय आरोप प्रत्यारोपांवर रोख लावत सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करावा. 

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जून, २०२० रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मुंबई पोलिसांनी सांगितले होते की, तो डिप्रेशनशी सामना करत होता आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली. या प्रकरणावर काही महिन्यांपर्यंत वाद सुरूच होता. निधनाच्या १५ दिवसानंतर सुशांतचे वडील कृष्ण कुमार सिंगने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले होते. तिने पैशांची हेराफेरी केल्याचा मोठा आरोप त्यांनी केला होता. ज्यात बिहार सरकारच्या याचिकेनंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे सोपविले होते.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत