Join us

सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर केलेत हे 10 आरोप, वाचून बसेल धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 10:29 IST

SHOCKING: एफआआरमध्ये सुशांतच्या वडिलांनी सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती हिच्यावर 10 गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्दे2019 मध्ये सुशांतच्या अकाऊंटमध्ये 17 कोटी रूपये होते. मात्र पुढच्याच काही महिन्यांत त्याच्या अकाऊंटमधून 15 कोटी रूपये काढण्यात आले.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग यांनी पाटणाच्या राजीव नगर ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास नसल्याने बिहारमध्ये एफआयआर दाखल करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या एफआआरमध्ये सुशांतच्या वडिलांनी सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती हिच्यावर 10 गंभीर आरोप केले आहेत. तेव्हा जाणून घेऊ यात काय आहेत हे आरोप...

आरोप  1सुशांत चित्रपटसृष्टी सोडून केरळमध्ये जाऊन ऑर्गेनिक शेती करू इच्छित होता. रियाने त्याना रोखून धरले होते. मी तुझ्यासोबत येणार नाही, असे सांगून तिने सुशांतला अडवून ठेवले होते.

आरोप 2सुशांतच्या वडिलांच्या आरोपानुसार, सुशांत केरळमध्ये शिफ्ट होण्याच्या निर्णयावर ठाम होता. सुशांत मानत नाही हे पाहून रिया त्याचे सर्व दागिणे, त्याचा सर्व पैसा, क्रेडिट कार्ड, आवश्यक कागदपत्रे आणि मेडिकल रिपोर्ट घेऊन आपल्या घरी निघून गेली. घरी जाऊन तिने सुशांतचा नंबर ब्लॉक केला होता.

आरोप 3सुशांतने बहिणीला रियाबद्दल सांगितले होते. ती सर्व कागदपत्रे घेऊन गेलीय, मला धमकी देतेय, असे त्याने बहिणीला सांगितले होते. तुझे सर्व मेडिकल रिपोर्ट मीडियाला देऊन तू पागल आहेस हे सिद्ध करेल. मग कोणीही तुला काम देणार नाही, अशी धमकी रिया देत होती.

आरोप 42019 मध्ये सुशांतच्या आयुष्यात रिया आली. तोपर्यंत सुशांत पूर्णपणे सामान्य होता. मग रियासोबत भेटल्यानंतर काहीच महिन्यांत असे काय झाले की, तो मानसिक रूग्ण झाला? सुशांत मानसिक रूग्ण असेल तर तो तसा होण्यामागे कारण काय? असा सवाल सुशांतच्या वडिलांनी केला आहे.

आरोप 5सुशांतला मानसिक समस्या होत्या तर रियाने त्याच्या कुटुंबाला याबद्दल काहीही का कळवले नाही? सुशांतच्या कुठल्याही अडचणीबद्दल, समस्येबद्दल सर्वप्रथम त्याच्या कुटुंबाला कळवणे आवश्यक होते. पण रियाने असे का केले नाही? असा आरोपही सुशांतच्या वडिलांनी केला आहे.

आरोप 6रिया सुशांतला आपल्या घरी घेऊन गेली आणि उपचारादरम्यान त्याला अनेकदा ओव्हरडोज दिले गेले. सुशांतला डेंग्यू झालाय, असे तिने सगळ्यांना सांगितले.

आरोप 7रिया सुशांतला कोणताही सिनेमा साईन करू देत नव्हती. कुठल्याही सिनेमाची ऑफर सुशांतला आली की, मला लीड हिरोईन म्हणून घेण्याची अट घाल, असे म्हणून ती सुशांतवर दबाव टाकायची.

आरोप 8सुशांतचा सर्वाधिक विश्वासू आणि जुना स्टाफ रियाने बदलला होता. त्यांना कामावरून काढून टाकत रियाने स्वत:च्या मर्जीतील लोकांना कामावर ठेवले होते. जेणेकरून सुशांतवर बारकाईने लक्ष ठेवता येईल.

आरोप 9डिसेंबर 2019 मध्ये रियाने बळजबरीने सुशांतचा नंबरही बदलला. जेणेकरून तो त्याच्या कुटुंबाशी व जवळच्या लोकांशी बोलू शकू नये. सुशांतने पाटण्याला जाऊन आपल्या कुटुंबाला भेटण्यासही तिने मनाई केली होती.

आरोप 102019 मध्ये सुशांतच्या अकाऊंटमध्ये 17 कोटी रूपये होते. मात्र पुढच्याच काही महिन्यांत त्याच्या अकाऊंटमधून 15 कोटी रूपये काढण्यात आले. हे पैसे अशा खात्यात ट्रान्सफर केल्या गेलेत, ज्याचा सुशांतशी काहीही संबंध नव्हता. रिया व तिच्या कुटुंबाच्या खात्यात किती पैसे आलेत व कुठून आलेत, याचा तपास व्हायला हवा अशी मागणी सुशांतच्या वडिलांनी केली आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती