Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतचा मृत्यू झाल्या दिवसापासून घरातील ही महत्त्वाची वस्तू अचानक झाली गायब, कुटुंबीयांचा CBI समोर खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 17:51 IST

सुशांत सिंग राजपूत प्रकरण आता सीबीआयसमोर एक कोड बनून उभं आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरण आता सीबीआयसमोर एक कोड बनून उभं आहे. सीबीआय या प्रकरणात छोट्यातील छोट्या गोष्टीची चौकशी करते आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी सीबीआय टीमला सांगितले की त्याच्या रुमची चावी मिळालेली नाही. 

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सुशांतचा मृतदेह ज्या खोलीत सापडला होता त्या खोलीची चावी गायब होती. सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबीयांनी त्याच्या खोलीच्या चावीबाबत हैराण करणारा दावा केला आहे. सुशांतच्या बहिणींनी सीबीआय अधिकाऱ्यांना सांगितले की पोलिसांनी त्यांच्या भावाच्या रुमच्या चाव्या दिल्या नाहीत. या प्रकरणाशी छेडछाड करण्यासाठी हे केले गेले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या रुमची चावी आतापर्यंत त्याला का दिली गेली नाही, हा प्रश्न कुटुंब विचारतेय. 

१४ जूनला मीतूने केला होता सुशांतला फोन १४ जूनला मी माझा भाऊ सुशांतला सकाळी १०.३० वाजता कॉल केला होता. पण त्याने माझा फोन उचलला नाही. त्यामुळे मी सिद्धार्थ पिठानीला कॉल केला. तो सुशांतसोबत राहत होता. त्याने मला सांगितले होते की, त्याने सुशांतला नारळ पाणी आणि डाळिंबाचं ज्यूस दिलं. तो आता झोपतोय. त्याने दरवाजा वाजवला होता, पण दरवाजा आतून बंद होता. मी सिद्धार्थ म्हणाला होता की, सुशांत कधीही आतून दरवाजा लॉक करत नाही आणि मी त्याला पुन्हा दरवाजा नॉक करण्यासाठी सांगितले होते. सुशांतला हेही सांगण्यास सांगितले होते की, मी त्याला कॉल करतेय. सिद्धार्थने मला सांगितले की, त्याने अनेकदा सुशांतच्या बेडरूमला नॉक केलं. पम त्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे तो दरवाजाच्या कि-मेकरला फोन करत आहे. जेणेकरून दरवाजा बाहेरून उघडता यावा. मी सिद्धार्थच्या या कॉलनंतर लगेच निघाले होते.

'मुंबई पोलिसांनी जबरदस्तीने घेतली स्टेटमेंटवर स्वाक्षरी', सुशांतच्या कुटुंबियांच्या वकिलांचा धक्कादायक आरोप

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत