Join us

Watch Video: सुशांतच्या लाडक्या कुत्र्याने सोडले जेवण, रात्रंदिवस न्याहाळतो मालकाचा फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 10:24 IST

Watch Video: या मुक्या प्राण्याचा शोक हृदय हेलावणारा आहे.

ठळक मुद्दे बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

सुशांत सिंग राजपूत नावाचा एक एक गुणी अभिनेता आपण गमावला. सुशांतने आत्महत्या करून आयुष्य संपवले. पण जातांना तो अनेकांना दु:खाच्या खाईत लोटून गेला. त्याच्या जाण्याने अनेकांच्या आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्याचा लाडका कुत्रा Fudge तर सुशांतच्या आठवणीने रात्रंदिवस झुरतो आहे. सुशांतच्या मृत्यूला सहा दिवस झालेत. या सहा दिवसांत त्याने काहीही खाल्ले नाही. या मुक्या प्राण्याचा शोक हृदय हेलावणारा आहे. सुशांतने लॅब जातीचा कुत्रा पाळला होता. या कुत्र्यासोबत त्याचे अत्यंत भावनिक नाते होते. सुशांत तासन् तास  याच्यासोबत खूप खेळायचा. मस्ती करायचा. त्याला अंगाखांद्यावर घेऊन प्रेम करायचा. मात्र रविवारी सुशांतने आत्महत्या केली. तेव्हापासून या कुत्र्याला सुशांतचा स्पर्श झालेला नाही. त्यामुळे तो उदास आहे. सुशांतचा कुत्रा सतत त्याचा फोटो जवळ घेऊन बसलेला असतो. सुशांत गेला तेव्हापासून त्याने काहीही खाल्लेले नाही. मुक्या प्राण्यांनाही भावना असतात, हे त्याने दाखवून दिले आहे. सुशांत गेला पण आपल्या लाडक्या मुक्या जीवाला दु:ख देऊन गेला.

 ‘बिग बॉस 10’चा विनर मनवीर गुर्जरने सुशांतच्या या कुत्र्याबद्दल पोस्ट लिहिली आहे. त्याचा फोटो त्याने पोस्ट केला आहे. या फोटोत सुशांतचा कुत्रा सुशांतचा फोटो घेऊन उदास बसलेला दिसतोय. अन्य एका फोटोत तो फोन घेऊन बसला आहे. जणू काही तो सुशांतच्या परतण्याची प्रतीक्षा करत असावा. ‘कोई और ना सही ये तो तेरी व्हॅल्यू आज भी जान ता है,’ असे ही पोस्ट करताना मनवीरने लिहिले आहे.

याशिवाय फोटोग्राफर विरल भयानी यानेही सुशांतच्या डॉगीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तो त्याच्याकडे फोन आहे आणि त्यात सुशांतचा फोटो आहे. डॉगीसोबत सुशांत मस्ती करतानाही या व्हिडीओत दिसतोय.

 बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतने गेल्या रविवारी त्याच्या मुंबईतल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. नेहमीच हसतमुख आणि एनर्जेटिक राहणा-या या अभिनेत्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत