Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतच्या सीएने केला शॉकिंग खुलासा; म्हणे, त्याच्या खात्यात तेवढे पैसे नव्हतेच...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 13:20 IST

दिला वर्षभराचा तपशील...

ठळक मुद्देसीएने सांगितले की, सुशांतच्या लाईफस्टाईलनुसार त्याचा खर्चही होता. तो एक फिल्म स्टार होता.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. सुशांतच्या बँक खात्यातून गेल्या वर्षभरात 15 कोटी रूपये काढले गेलेत. हे पैसे सुशांतचा काहीही संबंध नसलेल्या खात्यांमध्ये वळते केले गेले, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. मात्र आता सुशांतच्या सीएने वेगळाच खुलासा केला आहे. सुशांतच्या खात्यात इतके पैसे नव्हतेच, असे या सीएने म्हटले आहे.

‘इंडिया टुडे’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. सुशांतच्या सीएने  दिलेल्या माहितीनुसार, सुशांतचे काही पैसे रिया चक्रवर्तीने खर्च केले होते. पण सुशांतचे कुटुंब जितक्या रकमेचा दावा करतेय, तेवढी रक्कम सुशांतच्या खात्यात नव्हतीच.   सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीमध्ये सुशांतच्या खात्यात 17 कोटी असल्याचे म्हटले होते. तसेच गेल्या वर्षभरात यापैकी 15 कोटी रुपये काढले गेलेत. सुशांतच्या सीएने मात्र सुशांतच्या खात्यात इतकी मोठी रक्कम नव्हतीच, असे म्हटले आहे.

सीएने सांगितले की, सुशांतच्या लाईफस्टाईलनुसार त्याचा खर्चही होता. तो एक फिल्म स्टार होता. त्यामुळे रेंट, ट्रॅव्हल आणि शॉपिंगवर खर्च होता. गेल्या वर्षी सुशांतचे उत्पन्न घटले होते. सीएनने जानेवारी 2019 ते जून 2020 पर्यंत सुशांतने केलेल्या खर्चाचा तपशीलही दिला. त्यानुसार, 2 कोटी रूपये कोटक महिंद्रामध्ये टर्म डिपॉझिट, 3.87 लाख रूपये रेंट, 61 लाख रूपये केडब्ल्यूएला, 26.40 लाख फार्म हाऊसचा रेंट, 4.87 लाख रूपये एकत्र प्रवास, 50 लाख फॉरेन टूर, 2.5 कोटी आसाम ते केरळ टूर, 9 लाख डोनेशन असे ट्रान्जेक्शन झाले. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत