Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग राजपूत-अंकिता लोखंडेचे 'ते' गाणं आले समोर, जे कधी रिलीज नाही झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 12:41 IST

सुशांत आणि अंकिताची लव्हस्टोरी पवित्र रिश्ताच्या सेटवर सुरु झाली होती.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याचे जुने व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. सुशांतच्या आत्महत्येचा धक्का त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला बसला आहे. सुशांतच्या निधनानंतर अंकिता सोशल मीडियापासून दूर गेली आहे. याच दरम्यान दोघांचे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. सुशांत आणि अंकिताची लव्हस्टोरी पवित्र रिश्ताच्या सेटवर सुरु झाली होती. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या जवळ आले होते. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना देखील आवडली होती. 

 सोशल मीडियावर व्हायरल होणारे 'जैसी हो वैसी रहो' हे गाणं दोघांच्या मालिके दरम्यानचे आहे.न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार पवित्र रिश्ता मालिकेच्या शूटिंग दरम्यान या गाण्याचे शूट झाले हेता मात्र ते रिलीज होऊ शकले नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर फॅन्सनी हे गाणं रिलीज केले आहे. 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आता 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. पोलिसांनीदेखील आतापर्यंत जवळपास 28 लोकांचा जबाब नोंदवला आहे. मात्र सुशांतचे चाहते त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. ते पोलिसांच्या कारवाईवर समाधानी नाहीत. सोशल मीडियावर सुशांत आत्महत्या प्रकरणी सीबीआयने चौकशी करावी ही मागणी जोर धरताना दिसत आहे. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडे