Join us

सुशांत सिंग राजपूत का झाला नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 13:34 IST

होय, तुम्ही वाचताय ते अगदी खरंय. सध्या सुशांत सिंग राजपूत खुपच नाराज आहे. त्याच्या नाराजीचे कारणही अगदी योग्य आहे. ...

होय, तुम्ही वाचताय ते अगदी खरंय. सध्या सुशांत सिंग राजपूत खुपच नाराज आहे. त्याच्या नाराजीचे कारणही अगदी योग्य आहे. ते म्हणजे नुकतेच पार पडलेल्या अ‍ॅवॉर्ड सोहळयात ‘एम. एस.धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकसाठी त्याला ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चा अ‍ॅवॉर्ड न मिळाल्याने सुशांत सिंग राजपूत हा चांगलाच नाराज झाला आहे. भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर आधारित ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकमध्ये सुशांतसिंग राजपूत याने महेंद्रसिंगची भूमिका केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुशांतच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी देखील टिवटरवरून सुशांतच्या अभिनयाचे कौतुक केले तसेच त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. साहजिकच सुशांतच्या अपेक्षाही वाढल्या. पण, त्याला अनेक अ‍ॅवॉर्ड फंक्शनमधून ‘बेस्ट अ‍ॅक्टर अ‍ॅवॉर्ड’ साठी वगळण्यात आले. त्यामुळे तो नाराज आहे. एका मुलाखतीत तो म्हणाला,‘ मी खोटं बोलत नाही. पण, इतर कलाकार जेव्हा बेस्ट अ‍ॅक्टरचा अ‍ॅवॉर्ड जिंकत होते तेव्हा मला थोडंसं फिल होणं साहजिक आहे. पण, एखादा अ‍ॅवॉर्ड माझं काम थांबवू शकणार नाही. उत्कृष्ट कामगिरी करणं हेच कलाकार म्हणून माझं काम आहे.’२०१६चा सर्वांत हिट चित्रपटांपैकी एक म्हणून ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ चा उल्लेख करण्यात येतो. चित्रपटातील सर्व कलाकारांचे योगदान आणि विशेष म्हणजे सुशांतसिंगच्या अभिनयाचे कौतुक झाले.  सुशांतसिंग राजपूतचा बॉक्स आॅफिसवर सर्वांत जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला.