Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूरच्या 'छिछोरे' सिनेमाच्या दिग्दर्शकाने केली ही धमाल, वाचून येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 17:25 IST

लेखक-दिग्दर्शक नितेश तिवारी सध्या साजिद नाडियादवालाचा आगामी चित्रपट 'छिछोरे'च्या कामात व्यग्र आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

ठळक मुद्दे 'छिछोरे' सिनेमा पुढील वर्षी ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार

लेखक-दिग्दर्शक नितेश तिवारी सध्या साजिद नाडियादवालाचा आगामी चित्रपट 'छिछोरे'च्या कामात व्यग्र आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. ज्यात दोन पिढ्यांमधील लूक पाहायला मिळाला. एक सेट १९९२ सालातील कॉलेज व एक सध्याच्या काळातील आधारीत कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या कथानकासोबत चित्रपटातील पात्रांचे निकनेमदेखील दिग्दर्शकाने सांगितले आहेत. चित्रपटात वरूण शर्माच्या पात्राचे नाव सेक्सा आहे तर दुसरा पात्राचे नाव अॅसिड.

या सिनेमातील निकनेमबद्दल नितेश तिवारीला विचारले, त्यावर तो म्हणाला की, 'मी आयआयटीच्या दिवसांत चार वर्षे हॉस्टेलमध्ये काढली आहेत. त्यामुळे तिथल्या वातावरणाची व वेगवेगळ्या निकनेमबद्दल चांगलेच माहित आहे. त्यामुळे या चित्रपटात विचित्र निकनेम प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत.'नितेश पुढे म्हणाले की, 'पोस्टरवर पाहिलेली नावे माझ्या हॉस्टेलमधून घेतलेली आहेत. मात्र पात्रानुसार ती दिली आहेत. उदाहरणार्थ अॅसिड ज्याचे दुसऱ्यांवर खूप प्रभूत्व असेल, आईला जास्त मिस करणारी व इतरांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीचे निकनेम मम्मी. माझे आयआयटी बॉम्बेमध्ये मित्रमंडळी आहेत आणि गप्पा, गुक्की, पुक, बी झिरो, दर्द कुमार, स्कीनी, भिंडी, दांडा आणि अशी बरीच निक नेम असलेले माझे मित्र मंडळी आहेत.' 'छिछोरे' सिनेमा पुढील वर्षी ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची कथा मजेशीर असून या पोस्टरवर 'कुत्ते की दुम टेढ़ी, टेढ़ी की टेढ़ी' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. या पोस्टरवर सर्व कलाकारांची दोन पिढी पाहायला मिळते आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केल्यानंतर या सिनेमाबाबतची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूरसुशांत सिंग रजपूत