सुशांत सिंह राजपूत अन् जॅकलिन फर्नांडिस निघालेत ‘ड्राईव’वर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 17:23 IST
बॉलिवूडचा क्यूट बॉय सुशांत सिंह राजपूत आणि श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस एका ‘ड्राईव’वर निघालेत. गोंधळात ना? आम्ही बोलतोय, ते ...
सुशांत सिंह राजपूत अन् जॅकलिन फर्नांडिस निघालेत ‘ड्राईव’वर!
बॉलिवूडचा क्यूट बॉय सुशांत सिंह राजपूत आणि श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस एका ‘ड्राईव’वर निघालेत. गोंधळात ना? आम्ही बोलतोय, ते सुशांत व जॅकच्या नव्या चित्रपटाबद्दल. होय, करण जोहरच्या ‘ड्राईव’ या चित्रपटात सुशांत व जॅक ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक आज आऊट झाला. आॅरेंज कलरच्या सुपरकारसोबत सुशांत आणि बोल्ड अॅण्ड ब्युटिफुल जॅकलिन यात दिसतेय आणि त्यांच्या हातात आहे, क्लॅप बोर्ड.‘ड्राईव’ हा चित्रपट करण जोहर प्रोड्यूस करतोय. तर तरूण मनसुखानी याचे दिग्दर्शन करणार आहे. तरूणने २००८ मध्ये ‘दोस्ताना’चे दिग्दर्शन केले होते. त्यानंतरचा त्याचा हा पहिला चित्रपट असेल. काही दिवसांपूर्वी सुशांत व जॅक यांनी ‘फिल्मफेअर 2017’मध्ये एकत्र परफॉर्मन्स दिला होता. या परफॉर्मन्सच्या प्रॅक्टिसचा एक व्हिडिओ सुशांतने सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. केवळ इतकेच नाही तर सुशांत व जॅकची जोडी चित्रपटात पाहायला आवडेल, अशी इच्छाही व्यक्त केली होती. ‘ड्राईव’च्या निमित्ताने लोकांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. सुशांत सिंह राजपूत आणि श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र येणार आहेत. }}}}गतवर्ष जॅकलिन आणि सुशांतसाठी लकी राहिले. क्रिकेटपटू महेन्द्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘एमएस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’ने सुशांतच्या करिअरला चांगलाच वेग दिला. लवकरच सुशांतचा ‘राबता’ हा सिनेमा रिलीज होतो आहे. यात तो क्रिती सेनॉनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सुशांतप्रमाणेच जॅकलिननेही गतवर्षी सगळे हिट सिनेमे दिलेत.